• Download App
    ज्येष्ठांनो घरात छोटी- मोठी कामे करा|Seniors, do small and big things in the house

    विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : ज्येष्ठांनो घरात छोटी- मोठी कामे करा

    बसून राहण्यापेक्षा आपल्याच घरात छोटी-मोठी कामे करणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींचे आरोग्य चांगले राहते, असे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. याबाबतचा नवा संशोधन अहवाल बीएमजे ओपन या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. ज्येष्ठ नागरिकांनी त्यांची स्वत:ची दैनंदिन कामे आणि इतर घरातील छोटी कामे केल्याने त्यांची स्मृती टवटवीत राहते, प्रतिसाद क्षमता चांगली राहते, तसेच पायांमधील बळही टिकून राहण्यास मदत होते, असे या संशोधनात पुढे आले आहे. ‘ॲक्टिव्ह’ राहणाऱ्या ज्येष्ठांना चालताना किंवा जिना चढताना-उतरताना पडण्याची भीती वाटत नाही, असेही दिसून आले आहे.Seniors, do small and big things in the house

    नियमित शारीरिक काम केल्याने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकून राहण्यास मदत होते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. उतारवयाकडे झुकत असतानाही हात-पाय कामात गुंतवून ठेवल्यास आरोग्याचे अनेक धोके टळतात, असे दिसून आले आहे. २०१६ मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, श्रीमंत देशांमधील ज्येष्ठ नागरिकांमध्ये घरात काम न करण्याची प्रवृत्ती अधिक प्रमाणात असते. त्यामुळे त्यांच्यात वयानुसार येणाऱ्या आजारांचे प्रमाणही अधिक असते. कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये मात्र ज्येष्ठ नागरिक अधिक प्रमाणात कामे करतात, त्यामुळे त्यांची प्रकृती टिकून राहते.

    या संशोधनासाठी संशोधकांनी सिंगापूरमधील २१ ते ९० या वयोगटातील निवडक व्यक्तींच्या दिनचर्येचा अभ्यास केला. त्यांची २१ ते ६४ वर्षे आणि ६५ ते ९० वर्षेअशा वयोगटांत विभागणी करण्यात आली. शारीरिक क्षमता तपासण्यासाठी त्यांचा चालण्याचा वेग, जागेवर बसून पुन्हा उठण्याचा वेग मोजण्यात आला. तसेच स्मृती तपासण्यासाठी त्यांची बोलण्याची पद्धत, समोर घडणाऱ्या गोष्टींचे आकलन करण्याची क्षमता, त्यांना प्रतिसाद देण्याची क्षमता यांची नोंद घेण्यात आली. हे लोक किती प्रमाणात घरकाम करतात, किती नियमितपणे करतात याबाबतही माहिती घेण्यात आली.

    घरात फरशी पुसणे, धूळ साफ करणे, भांडी विसळून ठेवणे, इस्री करणे, स्वयंपाक करणे अशी कामे करणाऱ्यांच्या क्षमता टिकून राहिल्याचे किंवा असे काम न करणाऱ्यांच्या तुलनेत चांगल्या असल्याचे दिसून आले आहे.

    Seniors, do small and big things in the house

    Related posts

    नुसतीच तोंडी महाराष्ट्र पेटण्याची भाषा, पण शौचालय + साखर घोटाळ्यातल्या शिलेदारांना वाचवण्याची पवारांची का नाही क्षमता??

    राजकारणात मुरलेले पवार काका – पुतण्या “जे” टाळू शकले नाहीत, “ते” तरुण वरूण गांधींनी टाळून दाखविले!!

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!