SECULAR MAHARASHTRA: ‘शालेय अभ्यासक्रमात ‘श्रीमद्भगवद्गीते’चा समावेश करणार नाहीच !’ ठाकरे पवार सरकारचा ठाम निर्णय …


विशेष प्रतिनिधी 

मुंबई : गुजरात सरकारने शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्याचा निर्णय घेतला. कर्नाटक सरकार देखील याबाबतीत सकारात्मक आहे .महाराष्ट्र राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात देखील भगवद्गीतेचा समावेश करण्याची मागणी होत असतांना ठाकरे पवार सरकारने मात्र यास स्पष्ट नकार दिला आहे .भाजपच्या या मागणीला केराची टोपली दाखवली आहे .मदरशांना सरकारी अनुदान मिळत असताना धर्मनिरपेक्षता केवळ हिंदूसाठीच का ? असा सवाल आता उपस्थित होतो आहे .SECULAR MAHARASHTRA: ‘Srimadbhagavad Gita will not be included in school curriculum!’ Thackeray Pawar government’s firm decision …

काय आहे मागणी ?

भगवद्‌गीता हे जीवन जगण्याचे एक सुत्र आहे. महाराष्ट्र सरकारनं सुद्धा भगवद्‌गीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा यासारखे संत साहित्याचा समावेश शालेय शिक्षणात केला पाहिजे. जेणेकरुन महाराष्ट्रातील भावी पिढी संस्कारक्षम होईल ; त्यांना महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा याचं ज्ञान असेल !’ अशी मागणी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी राज्य सरकारकडे केली होती.SECULAR MAHARASHTRA: ‘Srimadbhagavad Gita will not be included in school curriculum!’ Thackeray Pawar government’s firm decision …

यावर ठाकरे पवार सरकारचे मत …

वर्षां गायकवाड म्हणाल्या की,’राज्यातील शालेय शिक्षणात भगवद्गीता व संत साहित्यांचा समावेश करण्याची मागणी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी राज्य सरकारकडे केली आहे. मात्र ही मागणी मान्य करता येणार नाही.

त्या पुढे म्हणाल्या,’भारतीय संविधानात धर्मनिरपेक्ष तत्वाचा समावेश असून मुलांच्या मानात शालेय अभ्यास क्रमातून हे रुजवले पाहिजे तसेच मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे ही राज्य सरकारची भूमिका आहे. आणि भगवद्गीता हा धार्मिक ग्रंथ आहे. त्यामुळे केवळ हिंदू धर्मशास्त्राचा समावेश करताच येणार नाही .

SECULAR MAHARASHTRA: ‘Srimadbhagavad Gita will not be included in school curriculum!’ Thackeray Pawar government’s firm decision …

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात