SARA ALI KHAN : जॅकलिन-नोरा-आता सारा….सुकेश चंद्रशेखरकडून चॉकलेट्स-घड्याळं गिफ्ट ! सारा अली खान ईडीच्या रडारवर…

विशेष प्रतिनिधी

मुंबई :जॅकलिन फर्नांडीस आणि नोरा फतेही यांचं सुकेश चंद्रशेखर सोबतच अफेअर, त्याने त्यांना दिलेले गिफ्टस्. त्यांचे काही फोटो हे सगळं व्हायरल होत असतानाच आता सारा अली खानही ईडीच्या रडारवर आली आहे. कारण खंडणीखोर सुकेश चंद्रशेखरने सारा अली खानला गिफ्ट दिले आहेत. त्यामुळे अभिनेत्री सारा अली खान ईडीच्या रडारवर आहे.SARA ALI KHAN: Chocolates, watches gift from Sukesh Chandrasekhar! Now Sara Ali Khan is on ED’s radar …

मात्र या प्रकरणी 14 जानेवारी 2022 ला ईडीने सारा अली खानची चौकशी केली होती. त्यावेळी तिने आपण कोणत्याही भेटवस्तू सुकेश उर्फ सुरज रेड्डीकडून स्वीकारल्या नसल्याचं अधिकाऱ्यांना सांगितलं होतं. सारा अली खानने ईडीला हेदेखील सांगितलं होतं की सुरजला अनेकवेळा मैत्री करण्यासाठी तिने नकार दिला. त्यानंतर अखेर तिने चॉकलेट्सचा बॉक्स घेण्याबाबत सहमती दर्शवली. त्यानंतर सुरज उर्फ सुकेशने तिला फ्रँक मुलर हे घड्याळ पाठवलं. या घड्याळ्याची किंमत भारतात लाखोंच्या घरात आहे.

सारा अली खानसोबत मैत्री करण्याच्या उद्देशाने चॉकलेट्स आणि फ्रँक मुलर घड्याळं देण्यात आली होती अशी माहिती इंडिया टुडेच्या सूत्रांनी दिली आहे. याआधीच्या तपासात हे समोर आलं होतं की सुकेश चंद्रशेखरने कॅनेडियन वंशाची अभिनेत्री नोरा फतेहीला BMW कार गिफ्ट केली होती.

तर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीसला त्याने दहा कोटींहून अधिक किंमतीच्या वस्तू भेट दिल्या होत्या. त्यामुळे जॅकलिन आणि त्याचं प्रकरण गाजलं होतंच आता या सोबतच सारा अली खानचंही नाव समोर आलं आहे.

SARA ALI KHAN: Chocolates, watches gift from Sukesh Chandrasekhar! Now Sara Ali Khan is on ED’s radar …

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात