संजय राऊत यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये ; मंदिर मुद्यावर चंद्रकात पाटील यांनी झापले


विशेष प्रतिनिधी

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये, अशा शब्दात भाजपचे प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना झापले आहे. Sanjay Raut should not teach us Wisdom ; Chandrakant patil told him

राज्यातील मंदिरे उघडा या मागणीसाठी भाजप राज्यभर आंदोलन करत आहे. परंतु मंदिरे उघडायची असेल तर दिल्लीत जाऊन घंटा वाजवा, असा सल्ला संजय राऊत यांनी भाजपाला दिला होता. त्यांच्या च्या सल्लाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी शहाणपण शिकवू नका , असे सांगितले आहे.

संजय राऊत म्हणजे खोट बोल आणि रेटून बोल असे व्यक्तीमत्व असल्याची टीका त्यांनी केली आहे. मंदिर बंद ठेवण्याबाबत केंद्र सरकारने अशी कुठलीही भूमिका मांडली नाही. देशातील सर्वच राज्यातील मंदिरे खुली आहेत. त्यामुळे निर्बंध घालून मंदिरे सुरू करण्यास हरकत नाही, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. पण राज्यात जवळपास सर्वच गोष्टी सुरू झाले आहे बार सुरू आहेत. मग मंदिर सुरू करण्यास काय अडचण आहे ? असा सवालही महाविकास आघाडीला त्यांनी विचारला आहे.

  • – संजय राऊत यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये
  • -दिल्लीत जाऊन घंटा वाजवा याला जोरदार प्रत्युत्तर
  • – महाराष्ट्र सोडून इतर राज्यात मंदिरे सुरु आहे
  • – बारला परवानगी मग, मंदिरांना टाळे का ?
  • – खोट बोल आणि रेटून बोल, अशी राऊत यांची वृत्ती

Sanjay Raut should not teach us Wisdom ; Chandrakant patil told him

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण