• Download App
    भारतातील कोरोना लसीचे प्रमाणपत्र चालणार ९६ देशांमध्येRohit Sharma named India's T20 Capt

    T20 मध्ये रोहित शर्माच टीम इंडियाचा कॅप्टन; न्यूझीलंड विरुद्धचा संघ घोषित

    वृत्तसंस्था

    मुंबई : T20 वर्ल्ड कप मध्ये हरून विराट कोहली भारतीय टीमच्या कर्णधार पदावरून बाजूला झाल्यानंतर भारतीय टीमचे कर्णधारपद रोहित शर्माला बहाल करण्यात आले आहेत. टी-ट्वेंटीच्या कर्णधार पदाविषयी विराट कोहली हस्तक्षेप करून रोहित शर्माला कर्णधारपद मिळू देणार नाही. त्याऐवजी के. एल. राहुल याला कर्णधार करण्यात येईल, अशा अटकळी बांधण्यात आल्या होत्या. परंतु त्या सगळ्या फोल ठरल्या. Rohit Sharma named India’s T20 Capt

    विराट कोहली कर्णधार पदावरून बाजूला झाल्यानंतर t 20 भारतीय टीमचे कर्णधारपद रोहित शर्माकडेच देण्यात आले आहे.

    त्याचबरोबर न्यूझीलंडविरुद्धची टीम देखील घोषित करण्यात आली आहे. यामध्ये ऋषभ पंत, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, भुवनेश्वर कुमार, के. एल. राहुल यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर सूर्यकुमार यादव, ईशान किशन, अवेश खान, युजवेंद्र चहल, आर. अश्विन, हर्षल पटेल, अक्षर पटेल, व्यंकटेश अय्यर आणि शिराज मोहम्मद यांचाही समावेश करण्यात आला आहे.

    Rohit Sharma named India’s T20 Capt

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    पश्चिम बंगाल प्रमाणेच उत्तर प्रदेशात काँग्रेस लागली कामाला; भाजपची सत्ता आणायला!!

    केरळ मध्ये सरकारच्या शपथविधी समारंभात मंत्री शपथ घेत असताना राहुल गांधी आणि मुख्यमंत्री सतीशन‌ स्टेजवर लहान मुलीबरोबर हास्यविनोदात दंग!!

    पंचपरिवर्तन हाच आजच्या हिंदुत्वाचा युगधर्म; संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळेंचे प्रतिपादन