• Download App
    रामचंद्र गुहा म्हणतात, तीन गांधींनी केवळ काँग्रेसच नव्हे, तर राजकारणच सोडलेे पाहिजे! | The Focus India

    रामचंद्र गुहा म्हणतात, तीन गांधींनी केवळ काँग्रेसच नव्हे, तर राजकारणच सोडलेे पाहिजे!

    • तीन गांधींची राजेशाही विरुध्द विचारसरणीची बांधिलकी मानणारे मोदी, शहा, नड्डा यांच्या लढाईत कॉँग्रेसचा पराजय निश्चित!

    विशेष प्रतिनिधी 

    नवी दिल्ली : गांधी कुटुंबातील तिघेही राजेशाही असल्यासारखे वागतात. दुसºया बाजुला भारतीय जनता पक्षाचे नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे. पी. नड्डा हे विचारसरणीच्या बांधिलकीतून एकत्र येऊन कठोर परिश्रम करत आहेत. त्यामुळे भाजपाच्या विरुध्द कॉँग्रेसचा पराजय होणे निश्चित आहे, असे रोखटोक मत ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केले आहे. म्हणूनच सोनिया, राहुल, प्रियांका या तीनही गांधींनी केवळ काँग्रेसच नव्हे, तर राजकारणच सोडलेे पाहिजे, असेही त्यांनी ठणकाहून म्हंटले आहेे. Ramchandra Guha says that the three Gandhis

    देशातील समकालीन राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना रामचंद्र गुहा यांनी लिहिले आहे की, सध्याच्या परिस्थितीती कॉँग्रेस तीन गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला प्रभावी किंवा विश्वासार्ह पर्याय देऊ शकत नाही. याचे कारण म्हणजे मोदी, शहा आणि नड्डा एकत्रित राजकीय विचारसरणीने एकत्र आले आहेत. त्यांची बांधिलकी पक्ष आणि विचारसरणीशी आहे. वैयक्तिक किंवा कौटुंबिक फायद्यापेक्षा त्यांना देशाची काळजी आहे. तिच त्यांना कठोर परिश्रम करण्याची शक्ती देते. Ramchandra Guha says that the three Gandhis

    गुहा म्हणाले, कोरोना महामारी आणि शेतकºयांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी जाहीर केले की आपण वाढदिवस साजरा करणार नाही. त्यांच्या या घोषणेतील व्यर्थपणा अगदी स्पष्ट दिसणार आहे. मात्र, त्यापेक्षाही त्यांची मनोवृत्ती दर्शविणारा आहे. गांधींना वाटते की देशात अद्यापही राजेशाहीसारखे आहे. त्यामुळे वाढदिवसाची एक पार्टी रद्द करून त्यांना वाटते की आपण देशासाठी खूप मोठा त्याग केला.

    कॉँग्रेसमध्ये सध्या तीनच महत्वाच्या व्यक्ती आहेत. त्यांची नावे गांधी, गांधी आणि गांधक्षच आहेत. ते तिघेही एकाच कुटुंबातील आहेत. एक आई आणि तिची दोन मुले. हे तिघेही राजकारणात आले कारण त्यांच्या कुटुंबाचे पूर्वज राजकारणात होते. पूर्वजांनी राजकारणात जे स्थान मिळविले ते त्यांना हवे आहे. माजी पंतप्रधानांची पत्नी म्हणून सोनिया गांधी कॉँग्रेसमध्ये कार्यरत झाल्या. त्यांची दोन्ही मुले कॉँग्रेसमध्ये आली कारण त्यांचे आई-वडील राजकारणात होते.

    गांधी या आडनावाचा विशेषाधिकार त्यांना मिळाला आहे. त्यामुळेच राजकारणात त्यांना किंमत आहे, हे समजून घ्यायला हवे. दुसºया बाजुला भारतीय जनता पक्षाच्या तीन सर्वात महत्वाच्या व्यक्तींची नावे मोदी, शाह आणि नड्डा अशी आहेत. ते एकाच कुटुंबातील नाहीत. त्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. राज्य किंवा राष्ट्रीय राजकारणात कोणताही घराण्याचा वारसा नाही. तिघेही स्वयंभू राजकारणी आहेत. स्वत:च्या अथक प्रयत्नांतून आणि कष्टातून त्यांनी राजकारणात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे.

    राहुल म्हणतात, “शेतकऱ्यांचा मोदींवर विश्वास नाही”; पवारांनी मात्र करवून दिली कर्तव्याची जाणीव

    गांधी कुटुंबयांना कोणत्याही राजकीय विचारसरणीच्या धाग्याने जोडलेले नाही. सोनिया आणि राहूल गांधी एक दिवस धर्मनिरपेक्षतेची दुहाई देतात आणि दुसºया दिवशी सॉफ्ट हिंदूत्वाचा प्रचार करतात. पूर्वीच्या कॉँग्रेसने केलेल्या आर्थिक सुधारणांचे श्रेय घेतात आणि दुसऱ्या दिवशी उद्योजकांवर टीका करतात. प्रियंका गांधी यांनी तर आत्तापर्यंत एकाही धोरणविषयक मुद्यांवर मत व्यक्त केले नाही. याचे कारण म्हणजे कॉँग्रेस चालविण्याचा दैवी अधिकार आपल्याला मिळाला आहे, असे त्यांना वाटते.

    शेतकरी आंदोलनात शिरकाव करूनही काँग्रेसचा बुडता पाय खोलातच; भाजपचा प्रभाव निवडणुकीत तोडणे कठीण

    कॉँग्रेस आणि भाजपाच्या नेतृत्वात मुलभूत फरक आहे. कॉँग्रेसच्या नेतृत्वाला वाटते की त्यांना विशेषाधिकार आहे. भाजपाचे नेतृत्व हे स्वनिर्मित आहे. ते प्रचंड कष्ट करतात. बिहारमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीचा प्रचार चरमसीमेवर पोहोचला असताना राहूल आणि प्रियंका गांधी सुट्टी साजरी करण्यासाठी हिमाचल प्रदेशात गेले होते. यावर राष्ट्रीय जनता दलाचा एक नेता म्हणाला होता की राहूल आणि प्रियंका सिमल्याला भेटी देत आहेत, हे पाहून असे वाटते की निवडणुका बिहारमध्ये आहेत की सिमल्यामध्ये. कॉँग्रेस पक्ष याच पध्दतीने चालविला जात आहे. त्याचा फायदा भाजपाला होत आहे. अगदी कॉँग्रेसच्या मित्रपक्षाचे प्रमुख असलेल्या शरद पवार यांनीही राहूल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

    बिहार निवडणुकांत भाजपाने विजय मिळविल्यावर अध्यक्ष जे. पी. नड्डा विश्रांती घेण्याऐवजी तातडीने देेेेशव्यापी दौºयावर निघाले. त्यांनी देशात १०० सभा घेण्याची घोषणा केली आणि त्याप्रमाणे कामही सुरू केले. दक्षिण आणि पूर्व भारतात त्यांनी दौरे सुरू केले. बिहारमधील विजयाने नड्डा यांना आणखी परिश्रम करण्यासाठी प्रेरीत केले. नड्डा आणि भाजपाचे नेते स्वत: रस्त्यावर उतरून पक्षवाढीसाठी प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी मात्र केवळ ट्विटरवर दिसतात. याचे कारण कॉँग्रेसचे प्रमुख असलेले गांधी कुटुंबिय कष्ट करण्यास असमर्थ आहे.

    Ramchandra Guha says that the three Gandhis

    सोनिया गांधी यांनी एकेकाळी कष्ट केले होते. मात्र, आता वय आणि तब्येत बिघडल्यामुळे त्यांच्यापुढे मर्यादा आहेत. मात्र, त्यांच्या दोन्ही मुलांनी रस्त्यावर उतरून राजकारण कधीही केले नाही. त्यांनी सोशल मीडियावर कॉमेंट करायच्या आणि समर्थकांनी अवास्तव स्तुतीने त्यांना भारावून टाकायले हेच त्यांचे राजकारण आहे. हातरस घटनेनंतर प्रियंका गांधी यांना रस्त्यावरच अडविल्यावर कॉँग्रेसचे कार्यकर्ते लगेचच त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहायला लागले. परंतु, त्यानंतर त्यांच्या राजकारणात सातत्य राहिले नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकांत कॉँग्रेसची दयनिय स्थिती झाली.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…