नाशिक : राहुल गांधींची कुत्री, तिचे नाव नुरी; काँग्रेस गेली डब्यात, तरी हौस होई ना पुरी!!, असे म्हणायची वेळ राहुल गांधींनीच आज आणली. कारण आज ॲनिमल डे निमित्त राहुल गांधींनी आपला एक व्हिडिओ आणि काही फोटो सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केले. त्यात, त्यांनी आमच्या एका नव्या फॅमिली मेंबरचे आगमन आमच्यासाठी आनंददायी ठरेल, असे वक्तव्यही लिहिले.Rahul Gandhi shared video with Noorie
याची कथा अशी :
राहुल गांधी ज्यावेळी गोव्याच्या दौऱ्यावर गेले होते, त्यावेळी एका कुटुंबातली कुत्र्यांची जोडी त्यांना खूप आवडली. त्यापैकीच एका कुत्रीचे नाव त्यांनी नुरी ठेवले आणि तिला त्या कुटुंबाने गोव्यातून विमान प्रवास करून दिल्लीत आणली. ती आज सोनिया आणि राहुल गांधी यांच्या 10 जनपथ निवासस्थानी दाखल झाली. या संपूर्ण प्रवासाचा व्हिडिओ राहुल गांधींनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केला आणि तो व्हायरल झाला.
पण राहुल गांधी आणि कुत्री यांचे राजकीय नातेही वेगळेच राहिले आहे.
काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे :
आसामचे सध्याचे मुख्यमंत्री आणि त्यावेळचे काँग्रेस नेते हेमंत विश्वशर्मा आसाम मधल्या काही राजकीय घडामोडींची चर्चा करण्यासाठी सोनिया आणि राहुल गांधींच्या निवासस्थानी म्हणजे 10 जनपथलाच गेले होते. तेथे राहुल गांधीने त्यांना वेळ जरूर दिली, पण हेमंत विश्वशर्मा यांनी बोलायला सुरुवात करताच राहुल गांधींनी आपल्या कुत्र्याला जवळ बोलावले आणि त्याला बिस्किटे खाऊ घालू लागले. हेमंत विश्वशर्मा यांच्या बोलण्याकडे राहुल गांधींनी लक्षच दिले नाही.
काही मिनिटे गेल्यानंतर हेमंत विश्वशर्मा वैतागले आणि तिथून ते बाहेर पडले त्यानंतर बऱ्याच घडामोडी झाल्या आणि हेमंत विश्व शर्मांनी काँग्रेस सोडली. त्यानंतर हेमंत विश्वशर्मांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते मुख्यमंत्री सर्वानंद सोनवल यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून 5 वर्षे राहिले आणि आज ते आसामच्या भाजप सरकारचे मुख्यमंत्री आहेत.
राहुल गांधींनी कुत्र्याला बिस्किट खाऊ घालण्याचा हौसेपोटी आसाम काँग्रेसचा दिग्गज नेता पक्षातून गमावला. आसाम मधली काँग्रेसची सत्ताही त्या पाठोपाठ गेली. ती पुढच्या निवडणुकीतही परत आली नाही. पण तरी देखील राहुल गांधी सुधारले नाहीत. आपले प्राणी प्रेम दाखविण्यासाठी त्यांनी नुरी कुत्रीचा व्हिडिओ शेअर केलाच.
कुत्रीचे नाव ठेवताना देखील त्यांनी “नुरी” ठेवले. यात देखील राहुल गांधींची “विशिष्ट मानसिकता” दिसलीच. पण त्या पलीकडे जाऊन वर नमूद केल्याप्रमाणेच घडले, राहुल गांधींची कुत्री, तिचे नाव नुरी; काँग्रेस गेली डब्यात, तरी हौस होई ना पुरी!!
Rahul Gandhi shared video with Noorie
महत्वाच्या बातम्या
- VIDEO : ‘स्वदेस’फेम बॉलिवूड अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारला इटलीमध्ये भीषण अपघात!
- शरदनिष्ठ राष्ट्रवादी उद्धव शिवसेना वळणावर; पक्षपाताचा आरोप केला निवडणूक आयोगावर!!
- बिहारच्या जातनिहाय जनगणनेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले, याचिकेवर 6 ऑक्टोबरला सुनावणी
- आप खासदार संजय सिंह यांच्या घरावर ईडीचा छापा; दिल्लीतील घराची झडती, अबकारी धोरण केसच्या आरोपपत्रात नाव