• Download App
    राहुल गांधींची फर्निचर मार्केटला भेट; लाकूड कापून खुर्ची बनवायला शिकले; मजुरांच्या समस्या घेतल्या जाणून|Rahul Gandhi Visits Furniture Market; learned to cut wood and make a chair; Knowing the problems of laborers

    राहुल गांधींची फर्निचर मार्केटला भेट; लाकूड कापून खुर्ची बनवायला शिकले; मजुरांच्या समस्या घेतल्या जाणून

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी गुरुवारी (28 सप्टेंबर) दिल्लीतील कीर्तीनगर फर्निचर मार्केटमध्ये पोहोचले. येथे राहुल कारपेंटर्सकडून खुर्ची बनवायला शिकले. त्यांनी लाकडावर करवत आणि प्लॅनरचा वापर केला. कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी बोलून त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या.Rahul Gandhi Visits Furniture Market; learned to cut wood and make a chair; Knowing the problems of laborers

    राहुल गांधींच्या या भेटीचा व्हिडिओ काँग्रेसने सोशल मीडियावर शेअर केला आहे. राहुल गांधी भारत जोडो यात्रेपासून सातत्याने कामगार आणि मजुरांच्या भेटी घेत आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधत आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. एप्रिलपासून या भेटी सुरू झाल्या आहेत.



    यापूर्वी, 21 सप्टेंबर रोजी डोक्यावर सामान घेऊन राहुल आनंद विहार रेल्वे स्टेशनवर पोहोचले होते. आनंद विहार ISBT, दिल्ली येथे ते पोहोचले आणि कुलींना भेटले. येथे त्यांनी कुलींचा लाल गणवेश परिधान केला होता आणि बिल्लादेखील लावला होता. यानंतर त्यांनी सामान डोक्यावर उचलले. त्यानंतर राहुल यांनी कुलींशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

    1 ऑगस्ट रोजी पहाटे 4 वाजता आझादपूर भाजी मंडईत पोहोचले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी 1 ऑगस्ट रोजी पहाटे दिल्लीच्या आझादपूर मंडईत पोहोचले. येथे त्यांनी भाजीपाला व फळांच्या वाढत्या किमतींबाबत विक्रेत्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान, त्यांना दुकानदारांनी घेराव घातल्याचे दिसून आले.

    7 जुलै रोजी शेतकऱ्यांसह शेतात लागवड केली. राहुल यांनी हरियाणातील सोनीपतमध्ये शेतकऱ्यांसोबत शेतात भात लागवड केली. तसेच ट्रॅक्टर चालवून शेतात नांगरणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी व शेतमजुरांशी शेतीबाबत चर्चाही केली होती.

    Rahul Gandhi Visits Furniture Market; learned to cut wood and make a chair; Knowing the problems of laborers

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pahalgam attack : माध्यमांनी सुरक्षा दलांच्या कारवायांचे थेट प्रक्षेपण करू नये; पहलगाम हल्ल्यानंतर सरकारची सूचना

    Gujarat : गुजरातेत एक हजाराहून अधिक बांगलादेशी ताब्यात; हरियाणात 460 पाकिस्तानी नागरिकांना हाकलून लावण्याचे आदेश

    Pahalgam attack : पाकिस्तानचा खरा सूड उगवणारे निर्णयकर्ते कामात मग्न; पण इतरांच्याच फुकट फाका, बडबड आणि फडफड!!