प्रतिनिधी
बीड : उद्धवा अजब तुझे सरकार म्हणत आमदार विनायक मेटे यांनी महा विकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. आर्यन खाननंतर वेळ मिळाला तर राज्यातील शेतकऱ्यांकडे पहा, अशी मागणी मेटे यांनी केली.Now after Aryan Khan Look at the farmers
बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये विनायक मेटे यांनी शेतकरी प्रश्नी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर टीका केली. बीड जिल्ह्यात दहा महिन्यातच १५९ आत्महत्या झाल्या असून प्रशासनासाठी ही लाजिरवाणी बाबा आहे.
प्रशासनाने किती आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन चौकशी केली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान,दिवाळीनंतर शिवसंग्राम रस्त्यावर उतरणार असून हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही. असा इशारा त्यांनी दिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App