- बंगालचे सरकार बरखास्तीचा ममतांकडूनच कांगावा; त्याला पवारांची साथ
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे खरेच तीन तेरा वाजले आहेत. तेथे भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षांच्या ताफ्यावर हल्ले होत आहेत. राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्यांचे सत्र बिनदिक्कतपणे सुरू आहे. अशा पार्श्वभूमीवर राज्य सरकार बरखास्त करण्याची स्वतःच आवई उठवून देण्याचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा डाव आहे. आणि त्याला ज्येष्ठ नेते शरद पवारांची साथ आहे. New political photo session in kolkata after bengalore
मूळात ममतांना भाजप आणि काँग्रेस विरोधी आघाडी करण्यात रस आहे. असा प्रयोग २०१८ मध्ये कर्नाटकात बेंगळुरूमध्ये एच. डी. कुमारस्वामी यांच्या शपथविधीमध्येच करण्यात आला होता. देशातल्या तमाम छोट्या पक्षांचे बडे नेते व्यासपीठावर एकत्र येऊन फोटो काढून निघून गेले होते. ते आता २०२० च्या शेवटी किंवा २०२१ च्या सुरवातीला कोलकात्यात फोटो सेशनसाठी जमणार आहेत. New political photo session in kolkata after bengalore
सर्व विरोधकांचे ऐक्य असे त्याला बेंगळुरूप्रमाणेच नाव देण्यात येणार आहे. पण त्यावेळी सोनिया गांधी फोटोच्या मध्यभागी उभ्या होत्या. कोलकात्यात त्या येतील का नाही, या विषयी शंका व्यक्त केली जात आहे. एक तर ममता त्यांना निमंत्रण देणार का आणि दिले तर त्या स्वीकारणार का, हे प्रश्न आहेत.
New political photo session in kolkata after bengalore
अर्थात सोनिया गांधी तेथे न येण्याचा सर्वात मोठा लाभ पवारांना मिळू शकतो. वयानुसार ते ज्येष्ठ नेते असल्याने ते फोटो सेशनच्या ममतांसह मध्यभागी उभे राहू शकतात. याचीच राजकीय चर्चा करण्यासाठी पवार कोलकात्याला जाणार आहेत.