• Download App
    Neeraj Chopra: निरज चोप्रा रुग्णालयात दाखल : पानीपतमधला कार्यक्रम अर्ध्यावर सोडला ; सत्कार समारंभात तब्येत अचानक बिघडली Neeraj Chopra: Niraj Chopra admitted to hospital: The program in Panipat was cut in half; His health suddenly deteriorated during the reception

    Neeraj Chopra: निरज चोप्रा रुग्णालयात दाखल : पानीपतमधला कार्यक्रम अर्ध्यावर सोडला ; सत्कार समारंभात तब्येत अचानक बिघडली

    वृत्तसंस्था 

    नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये अखेरच्या दिवशी गोल्ड मेडल मिळवणारा भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पानीपतमधला सत्कार समारंभ अर्ध्यावर सोडून नीरजला रुग्णालयात नेलं आहे. भारतात दाखल झाल्यापासून नीरजला ताप आला होता. विमानतळावर दाखल झाल्यानंतर नीरजची कोरोना चाचणी करण्यात आली होती, ज्याचा रिपोर्ट निगेटीव्ह आला होता.Neeraj Chopra: Niraj Chopra admitted to hospital: The program in Panipat was cut in half; His health suddenly deteriorated during the reception

    कोरोनाची चाचणी निगेटीव्ह आल्यामुळे नीरज चोप्रा स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला दिल्लीत सहभागी झाला होता. पानीपतमध्ये दाखल झाल्यानंतर नीरजचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. परंतू यावेळी नीरजला अचानक अस्वस्थ वाटायला लागल्यामुळे त्याला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दिल्ली ते पानीपत हा प्रवास नीरजने कारने केला होता. ३ तासांच्या या प्रवासाला नीरजला ६ तास लागले होते.

    भारतात आल्यानंतर नीरजला ताप आल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. ऑलिम्पिकवरुन भारतात परत आल्यानंतर नीरज सतत कार्यक्रम आणि सत्कार समारंभात व्यस्त आहे. या धावपळीमुळेच त्याच्यावर तणाव आल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

     

    Neeraj Chopra: Niraj Chopra admitted to hospital: The program in Panipat was cut in half; His health suddenly deteriorated during the reception

    Related posts

    विजय माल्ल्याला फ्रान्सच्या माध्यमातून परत आणण्याची तयारी; भारताने बिनशर्त प्रत्यार्पण मागितले

    खेळाडूंची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी पीसीबीचा अजब फॉर्म्युला; पाक क्रिकेटपटूंना कठोर लष्करी प्रशिक्षण, डोंगर चढायला लावले, 3 जखमी

    संदेशखळीत CBIची मोठी कारवाई, मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त!