• Download App
    NCW: National Commission for Women's Shakti Dialogue in Srinagar; Support for security and equality for Kashmiri women!! राष्ट्रीय महिला आयोगाचा श्रीनगर मध्ये शक्ती संवाद; काश्मिरी महिलांना सुरक्षा आणि समानतेचा आधार!!

    NCW : राष्ट्रीय महिला आयोगाचा श्रीनगर मध्ये शक्ती संवाद; काश्मिरी महिलांना सुरक्षा आणि समानतेचा आधार!!

    विशेष प्रतिनिधी

    श्रीनगर : राष्ट्रीय महिला आयोगाने संपूर्ण देशातील महिलांना सन्मान, सुरक्षा आणि समान संधीचा अधिकार देण्यासाठी सुरू केलेला शक्ती संवादाचा उपक्रम आज जम्मू – काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे पोहोचला. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली हा शक्ती संवादाचा उपक्रम श्रीनगर येथे संपन्न झाला.NCW: National Commission for Women’s Shakti Dialogue in Srinagar; Support for security and equality for Kashmiri women!!

    श्रीनगरमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) ‘शक्ती संवाद’ या प्रमुख कार्यक्रमाबद्दल बोलताना, NCW च्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर म्हणाल्या, सगळ्या भारतीयांच्या मनात जम्मू – काश्मीरबद्दल अतिशय आपुलकीची भावना आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या शक्ती संवाद कार्यक्रमाचा हा चौथा भाग आहे. श्रीनगर मध्ये कार्यक्रम घेण्याच्या आधी महिला आयोगाने हा कार्यक्रम अयोध्या, दिल्ली आणि मुंबई येथे आयोजित केला होता. जम्मू आणि काश्मीर मध्ये महिला सुरक्षेच्या बाबतीत परिस्थिती खूपच चांगली आहे. इथल्या महिलांना आता चांगल्या संधी मिळाल्या आहेत. राष्ट्रीय महिला आयोगांच्या माध्यमातून आम्ही POSH कायद्याबद्दल जनजागृती करत आहोत. केंद्र सरकारने लागू केलेल्या चार नवीन कामगार कायद्यांबद्दलही आम्ही इथे चर्चा केली. या कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे महिलांना सन्मान, सुरक्षा तर मिळालीच, पण समानतेची संधी सुद्धा प्राप्त झाली.



    जम्मू आणि काश्मीर मधली परिस्थिती आता निश्चितच चांगली झाली पाहिजे. तिचे महिलांना आणि युवकांना नवनव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. देशातल्या विविध भागांमधून इथे गुंतवणूक येत आहे. त्यामुळे राज्यांमध्ये उद्योग आणि व्यवसाय वाढायला अनुकूल वातावरण तयार झाले आहे. या वातावरणाचा लाभ सुद्धा महिलांना मिळतो आहे, असे विजयाताई रहाटकर यांनी स्पष्ट केले.

    NCW: National Commission for Women’s Shakti Dialogue in Srinagar; Support for security and equality for Kashmiri women!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    CBSE : 9वी-10वीत 3 भाषा शिकाव्या लागतील, CBSE चे नोटिफिकेशन जारी; 1 जुलैपासून लागू होईल; या वर्षी 10वीत तिसऱ्या भाषेचा पेपर नसेल

    राष्ट्रवादीतली भांडणे कमी पडली, म्हणून “कळलाव्यां”नी भाजप – शिवसेनेत काल्पनिक भांडणे सुरु केली!!

    Mamata Banerjee : ममता म्हणाल्या- ज्याला TMC सोडून जायचे आहे तो जाऊ शकतो; पक्षाला पुन्हा उभे करण्याचे आवाहन