Nawab Malik ED : राजीनामा घेतला नाही तरी नवाब मलिकांवरची कायदेशीर कारवाई नाही टळणार!!

नाशिक : कुख्यात तस्कर आणि मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुलीच्या कोठडीची हवा खात असलेल्या नबाब मलिक यांच्यामागे महाविकास आघाडीचे सर्व मंत्री जरी उभे राहिले असले तरी त्यांच्यावरची कायदेशीर कारवाई टळणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.Nawab Malik ED: Even if he does not resign, legal action against Nawab Malik will not be avoided !!

3 मार्च पर्यंत त्यांना ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश पीएमएलए कोर्टाने दिलेच आहेत. परंतु, नवाब मलिक यांच्याविरोधात राष्ट्रीय तपास संस्था आहे अर्थात एनआयएने देखील एफआयआर दाखल केला आहे. नवाब मलिक यांच्या गोवाला कंपाऊंड जमीन खरेदी व्यवहारातला पैसा थेट दाऊद इब्राहिम पर्यंत पोहोचल्याची एनआयएची माहिती आहे.



त्यामुळे देशांतर्गत झालेल्या मनी लॉन्ड्रिंग पेक्षा हा गुन्हा अधिक गंभीर ठरतो. जगातल्या मोस्ट वाँटेड गुन्हेगार आणि भारतातल्या स्फोटांचा सूत्रधार दाऊद इब्राहिमशी संबंध आणि आर्थिक व्यवहार यामुळे नवाब मलिक यांची केस इतर मनी लॉन्ड्रिंग पेक्षा वेगळी ठरली आहे.

ईडीची कोठडी संपल्यानंतर एनआयए नवाब मलिक यांचा ताबा कोर्टाकडे मागू शकते. आणि त्यानंतर एनआयएच्या तपासात आणखी कोणते महत्त्वपूर्ण खुलासे होतात त्याच्यातून राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्या बाबींवर प्रकाश टाकला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. म्हणूनच नबाब मलिक यांची मनी लॉड्रिंगची केस इतक्यात संपणारी नाही.

Nawab Malik ED: Even if he does not resign, legal action against Nawab Malik will not be avoided !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात