हैदराबादमधून यूएईला फसवून नेलेल्या तीन कुटुंबीयांची सरकारकडे मदतीची याचना

वृत्तसंस्था

हैदराबाद : चांगली नोकरी लावतो म्हणून हैदराबादेतून यूएईला नेलेल्य तीन कुटुंबीयांच्या सदस्यांचे त्या देशात हाल झाले. फसवणूक झाली. त्यांना भारतात परत आणण्यासाठी त्यांच्या हैदराबादमधील कुटुंबीयांनी केंद्र सरकारकडे मदतीची याचना केली आहे. My sister was offered a job in a beauty parlour in Dubai 

 

माझ्या बहिणीला ब्यूटी पार्लरमध्ये नोकरी देतो म्हणून एजंट तिकडे घेऊन गेला. तिला ब्यूटी पार्लरमध्ये नोकरी दिलीच नाही उलट एका घरी मोलकरीण म्हणून ठेवले. तिला एवढी मारहाण केली की तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. तिची सुटका करून भारतात आणावी, अशी मी केंद्र सरकारला विनंती करते, असे तिच्या बहिणीने एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले. My sister was offered a job in a beauty parlour in Dubai 

अशीच दोन कुटुंबेही पुढे आली असून त्यांनी ट्रॅव्हल आणि नोकरी एजंटाविरोधात तक्रार दाखल करण्याबरोबरच आपल्या कुटुंबातील सदस्याचे यूएईमध्ये कसे हाल चालले आहेत, याचे वर्णन केले आहे. केंद्र सरकारकडे या तीनही कुटुंबीयांनी आपल्या घरातील सदस्यांना भारतात परत आणण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे.

My sister was offered a job in a beauty parlour in Dubai

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*