MUMTAZ COMEBACK : गुलामी नहीं की बलमा…म्हणनार्या मुमताजला B’wood comeback साठी घ्यावी लागणार नवऱ्याची परवानगी …

६०- ७० च्या दशकात मुमताज यांनी अभिनय कौशल्य आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली होती.


मुमताज यांनी नुकताच इन्स्टाग्राम लाइव्ह केले आहे. या लाइव्हमध्ये एका चाहत्याने मुमताज यांना ‘तुम्ही बॉलिवूडमध्ये पुन्हा पदार्पण कधी करणार?’ असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी मजेशीर अंदाजात उत्तर देत म्हटले, ‘बॉलिवूड? मला नाही माहिती……


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मैने तुझसे मोहब्बत की हैं गुलामी नहीं की बलमा अस मुमताजच गाणं लोकप्रिय आहे . माञ मुमताजला B’wood मध्ये परतण्यासाठी नवर्याची परवानगी घ्यावी लागणार आहे …

मुमताजने आपल्या अभिनयाने आणि खास अंदाजाने  लाखो प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. मुमताज भारतापासून दूर परदेशात आपल्या कुटुंबासह आनंदी जीवन जगत आहेत. मुमताज यांनी अलीकडेच त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधला. ज्यामध्ये त्यांनी इंडस्ट्रीत परतण्याच्या प्रश्नाचे उत्तरही दिले. MUMTAZ COMEBACK: Will you return to Bollywood? Mumtaz said … I have to get permission from my husband …

https://www.instagram.com/tv/CZ7LoceJLj1/?utm_source=ig_web_button_share_sheet

रविवारी (१३ फेब्रुवारी) इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी, तान्या माधवानी, तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या आई मुमताज यांची त्यांच्या चाहत्यांशी एका इंस्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये ओळख करून दिली. या लाईव्ह सेशनमध्ये त्यांनी चाहत्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तरे दिली.

बॉलिवूडमध्ये पुनरागमनावर बोलल्या मुमताज

जेव्हा एका चाहत्याने मुमताज यांना त्यांच्या बॉलिवूडमध्ये परतण्याबद्दल विचारले तेव्हा त्या म्हणाल्या की, “बॉलिवूड, मला माहित नाही. आता मला खात्री नाही की, मला अशा प्रकारची भूमिका मिळेल जी खरोखर माझ्या हृदयाला स्पर्श करेल आणि तुम्ही लोक देखील माझ्यावर प्रेम कराल.

त्या भूमिकेत पाहून तुम्हाला कौतुक वाटेल. परत येण्यासाठी मला माझ्या नवऱ्याची परवानगी घ्यावी लागेल आणि जर त्यांनी सांगितले की, ते ठीक आहे तरच मी करेन.”

चाहत्यांचे मानले आभार

या सत्राच्या शेवटी मुमताज यांनी त्यांच्या चाहत्यांचे आभार मानले आणि म्हणाल्या की, “जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत माझ्यावर असेच प्रेम करत राहा आणि मला असेच आठवत राहा. पण मी गेल्यावर माझ्यासाठी रडू नका. आजही तुमच्यासाठी मी अशाच प्रकारे जोडलेली आहे.”

तरुण वयातच करिअरला केली सुरुवात
अभिनेत्रीने वयाच्या ११व्या वर्षी ‘सोने की चिडिया’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी राजेश खन्ना यांच्यासोबत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले.
१३ वर्षांच्या ब्रेकनंतर त्या १९९० मध्ये ‘आंधियां’मधून पडद्यावर परतल्या. पण त्यानंतर त्यांनी अभिनय सोडला आणि परदेशात गेल्या.

MUMTAZ COMEBACK: Will you return to Bollywood? Mumtaz said … I have to get permission from my husband …

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात