आसाम बालसंगोपन केंद्रे ‘अल कायदा’च्या पे लिस्टवर; खासदार अजमल यांच्या संशयास्पद उद्योगाविरुदध राष्ट्रीय बाल आयोगाची कारवाईची शिफारस


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आसामचे खासदार मौलाना बदरुद्दीन अजमल चालवत असलेल्या सहापैकी एका बालसंगोपन केंद्राला अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या गैरसरकारी संघटनेकडून देणगी मिळाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. MP Ajmal’s recommendation of action by the National Commission for Children against suspicious industries

राष्ट्रीय बालहक्क सुरक्षा आयोगाच्या पाहणीत असे आढळले की ,आसाम आणि मणिपूर येथील सहा बालसंगोपन केंद्रे मार्काझुल मारीफच्या नेतृत्वात सुरु असून मिळालेल्या निधीचा गैरवापर संस्थांनी केला .

बालसंगोपन केंद्रातील बालकांच्या संख्येतही तफावत आढळली. आयोगाच्या पाहणी दौऱ्यात 778 बालके आढळली. मात्र, खासदार अजमल यांच्या लोकसभेच्या वैयक्तिक माहितीत ही संख्या 1010 तर मार्काझुल मारीफच्या वेबसाईटवर 1080 मुले असल्याचे म्हंटले आहे. एकूणच तपासात मुलांची संख्या 300 ने कमी भरली आहे.

MP Ajmal’s recommendation of action by the National Commission for Children against suspicious industries

या पार्श्वभूमीवर आयोगाने कडक ताशरे ओढले असून सर्व मुलांना बालकल्याण आयोगासमोर हजर करावे, असे आदेश दिले. मुलांची अन्यत्र सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करावी, असेही म्हटले आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात