विशेष प्रतिनिधी
बीड: भाजपचे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांची जन आशीर्वाद यात्रा परळी येथील गोपीनाथ गडावरून निघाली. लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेऊन भागवत कराड यांनी या यात्रेला सुरूवात केली. यावेळी पंकजा मुंडे यांनी जनआशीर्वाद यात्रेला झेंडा दाखवला. यावेळी प्रीतम मुंडेही हजर होत्या. तिथे उपस्थित कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे अंगार है बाकी सब भंगार है, गोपीनाथ मुंडे अमर रहे अशा घोषणा दिल्या. ज्यानंतर पंकजा मुंडे यांनी अक्रामक पवित्रा घेत घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रचंड खडसावलं. Jan Ashirwad Yatra: Why did Pankajatai get angry? ‘What are you announcing? Otherwise don’t even come to see me … ‘
काय अंगार भंगार घोषणा देत आहात? दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम आहे का? आपले हे संस्कार आहेत का? गोपीनाथ मुंडे अमर रहे या घोषणा देण्यापासून मी तुम्हाला अडवू शकत नाही. मात्र बाकीच्या घोषणा देणं चुकीचं आहे. असं म्हणत घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना पंकजा मुंडे यांनी पुन्हा माझ्या दारात पाय ठेवायचा नाही असा आदेशही दिला .
अर्थराज्यमंत्री भागवत कराड हे बीडमधील परळीमध्ये आले. तिथून त्यांनी जन आशीर्वाद यात्रेला सुरूवात केली. प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा होती. मात्र मी नाराज नाही असंही पंकजा मुंडे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं. आता आज जेव्हा भागवत कराड परळीमध्ये आले तेव्हा काही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यावरून पंकजा मुंडे चांगल्याच भडकल्या होत्या.
पंकजा मुंडे-
‘मी शिकवलं आहे का तुम्हाला असं वागायला? मुंडे साहेब अमर रहे या घोषणा मी रोखू शकत नाही. पण काय अंगार भंगार घोषणा करत आहात? हा दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम आहे का? मला हे वागणं शोभत नाही. जेवढ्या उंचीची मी आहे तेवढी लायकी ठेवा स्वतःची, नाहीतर मला भेटायलाही येऊ नका. असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची यात्रा ठाणे, रायगड जिल्ह्य़ांत 570 किलोमीटर प्रवास करणार आहे. डॉ. भारती पवार यांची यात्रा पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्य़ांतील पाच लोकसभा मतदारसंघांत प्रवास करेल. डॉ. भागवत कराड यांची यात्रा मराठवाडय़ातील सात लोकसभा मतदारसंघांतून प्रवास करणार आहे. तर नारायण राणे यांची यात्रा 19 ऑगस्ट रोजी मुंबईतून सुरू होईल. वसई- विरार महापालिका क्षेत्र आणि रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत ही यात्रा 650 किलोमीटर एवढा प्रवास करेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App