जम्मू-काश्मीरचा चुकीचा नकाशा, विकिपीडियाला कारवाईची तंबी

जम्मू काश्मीरचा चुकीचा नकाशा हटवण्याचे आदेश ‘विकिपीडिया’ला भारत सरकारकडून देण्यात आले आहेत. अन्यथा विकिपीडियावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरचा चुकीचा नकाशा हटवण्याचे आदेश ‘विकिपीडिया’ला भारत सरकारकडून देण्यात आले आहेत. अन्यथा विकिपीडियावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. विकिपीडियाने जम्मू आणि काश्मीरचा चुकीचा नकाशा प्रसिध्द केला आहे. एका ट्विटर वापरकर्त्याने ही गोष्ट समोर आणल्यानंतर ही गोष्ट निदर्शनास आली होती. 

‘विकिपीडिया’नं भारत-भूतान संबंधांशी निगडीत लिंकवर चुकीचा जम्मू काश्मीर नकाशा दर्शवल्याचं या युझरनं लक्षात आणून दिल्यानंतर अनेकांचं लक्ष याकडे गेलं होतं. भारतीय नागरिकांकडून यासंदर्भात कारवाई करण्याचा आग्रह सरकारकडे केला होता.

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयानं माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६९ ए नुसार विकिपीडियाला जम्मू काश्मीरचा चुकीचा नकाशा दर्शवणारी लिंक हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

नकाशात बदल करण्यात आला नाही तर अशा वेळी कंपनीविरोधात कायदेशाीर कारवाई करण्यात येईल, अशी तंबीही सरकारकडून देण्यात आलीय. कारवाईनुसार विकिपीडियाचा संपूर्ण मंच ब्लॉक करण्याचाही विचार केला जाऊ शकतो.  

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात