INDIA-UKRAINE : मोदी सरकारने वारंवार सूचना देऊनही नाही सोडले युक्रेन ! दोष कुणाचा ?- तरीही पंतप्रधान ANYHOW आपल्या नागरिकांना मायदेशात परत आणणारचं….वाचा सविस्तर विश्लेषण …

रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने (Indian Embassy) भारतीय नागरिकांसाठी पहिली अ‍ॅडव्हायझरी जारी केली ती तारीख होती १५ फेब्रुवारी .युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांनी वेळीच दखल घेऊन परत येण्याची घाई करायला हवी होती.


माधवी अग्रवाल

औरंगाबाद : रशिया युक्रेन युद्धाची चाहूल लागताच अमेरिकेने युक्रेन मधून त्यांच्या नागरिकांना परतण्याचे आवाहन केले होते .त्याच दिवशी भारताने देखील तत्काळ अ‍ॅडव्हायझरी जारी करत तेथील भारतीयांना लवकरात लवकर भारतात परतण्याचे आवाहन देखील केले होते .मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने हजारो भारतीय युक्रेन मध्ये अडकले आहेत .त्यातील बऱ्याच नागरिकांना विशेष विमानाने भारतात आणले गेले  आणि आता उर्वरित नागरिकांना भारतात सुखरूप परत आणण्यासाठी मोदी सरकारने अनेक प्रकारे प्रयत्न सुरू केले आहेत .मोदी सरकारने वेळीच सर्व सूचना जारी केल्या होत्या मात्र आता अनेकजण केंद्र सरकारच्या नावाने बोटं मोडताय यात दोष नेमका कुणाचा ? ….INDIA-UKRAINE: Modi govt gives repeated instructions – still does not leave Ukraine! Whose fault is it? – The Prime Minister is ready to bring them back; India ANYHOW to bring its citizens back home…. read detailed analysis…

पहिली सूचना ….15 फेब्रुवारी ….

या युद्धाची चाहूल लागताच भारताकडून तत्काळ अ‍ॅडव्हायझरी जारी करण्यात आली होती .मात्र याकडे भारतीयांनी दुर्लक्ष केले .
मोदी सरकारने १५ तारखेलाच जारी केली होती पहिली सूचना
त्यानुसार भारतीयांनी लवकरात लवकर युक्रेन सोडण्याचे सांगण्यात आले होते .

भारतीय दूतावासाकडून हे देखील सांगितले की, जर आवश्यकता नसेल तर विद्यार्थ्यांनी तिथे राहू नये. त्यांनी तत्काळ युक्रेन सोडून भारतात परतावे. तर, जे युक्रेनमध्ये रहाणार आहेत त्यांनी अनावश्यक प्रवास टाळावा असं दुतावासाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटलं होत.

युक्रेनमधील भारतीयांना त्यांच्या उपस्थितीबद्दलची माहिती देण्याचे आवाहन देखील करण्यात आले होते. जेणेकरून दूतावासातून त्यांच्याशी संपर्क साधता येईल. भारतीय दुतावास हा नेहमीप्रमाणे काम सुरु ठेवणार असल्याची माहिती  देखील प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली होती .INDIA-UKRAINE: Modi govt gives repeated instructions – still does not leave Ukraine! Whose fault is it? – The Prime Minister is ready to bring them back; India ANYHOW to bring its citizens back home…. read detailed analysis…

युक्रेनमध्ये भारतीयांची संख्या किती?

युक्रेनची राजधानी असलेल्या कीव येथील भारतीय दूतावासाने आपल्या अंदाजानुसार २०२० पासून सुमारे १८ हजार भारतीय विद्यार्थी असल्याचे, म्हटले आहे. तर यूएनमधील भारतीय राजदूताकडून गेल्या महिन्यात ही संख्या २० हजार असल्याचे सांगितले गेले होते. या मधील बहुतांश विद्यार्थी हे तेथील वैद्यकीय महाविद्यालयांचे विद्यार्थीआहेत .

भारतीय दूतावासाने पहिली  अ‍ॅडव्हायझरी जारी केली होती त्या मागचा नेमका अर्थ काय होता ?

युक्रेनमध्ये ज्यांची उपस्थिती आवश्यक नाही त्यांनी देश सोडावा, असे दूतावासाकडून स्पष्ट करण्यात आले  होते .याचा अर्थ असा होता की कीव विमानतळ अजूनही कार्यरत होत आणि युक्रेनमधून नियमित उड्डाणे सुरू असल्याने भारतीय नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा. कारण याचा अर्थ युक्रेन सोडून जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी कदाचित लवकरच मार्ग देखील कमी उरू शकतात. भारतीय दूतावास युक्रेनमध्ये उपस्थित असलेल्या भारतीय नागरिकांची माहिती गोळा केली . काही आठवड्यांपूर्वी प्रसारित केलेल्या गुगल फॉर्मद्वारे भारतीयांना भारतीय दूतावासाच्या वेबसाइटवर स्वतःची नोंदणी करण्यास सांगितले गेले होते .

18 फेब्रुवारीला भारताकडून परतीच्या विमाना संबंधित सूचना प्रसारित करण्यात आली होती .मात्र त्यात कुठलेही बुकिंग झाले नव्हते .

कीवमधील भारतीय दूतावासाची अ‍ॅडव्हायझरी…

20 फेब्रुवारी 2022 रोजी युक्रेनची राजधानी कीव येथील भारतीय दूतावासाने सर्व भारतीय विद्यार्थ्यांनी तात्पुरते युक्रेन सोडावे असा  सूचना जारी केल्या होता. यासोबतच दूतावासाने विद्यार्थ्यांना चार्टर फ्लाइटसाठी संबंधित कॉन्ट्रॅक्टरशी संपर्क साधावा आणि दूतावासाच्या सोशल मीडिया चॅनल आणि वेबसाइटवर प्रसिद्ध होणाऱ्या अपडेट्सवर लक्ष ठेवावे, असे आवाहन केले होते.मात्र परतीच्या विमानासाठी कुठलीही बुकिंग न झाल्याने 20तारखेचे विमान रद्द करून पुन्हा एकदा सूचना जारी करण्यात आल्या होत्या .

22 तारखेला परत एकदा तिसरी सूचना जारी करण्यात आली होती. त्यात भारतीय विद्यार्थ्यांनी युक्रेन सोडावे म्हणून यूक्रेन युनि्हर्सिटीने ऑनलाईन लेक्चरला परवानगी दिली होती ती देखील भारत सरकारच्या विनंती नंतरच .

त्याच दिवशी रशियन भाषा येणाऱ्या अधिकाऱ्यांना कीव येथे पाठवण्यात आले होते जेणेकरून ते तेथील भारतीयांना मदत करू शकतील .

कीवमधील भारतीय दूतावासाने विद्यार्थी आणि भारतीय नागरिकांसाठी वारंवार सूचना जारी केल्या यामध्ये सर्वांना तात्पुरते युक्रेन सोडण्याचा सल्ला देण्यात आला होता.तरीही भारतीय विद्यार्थी युक्रेन सोडण्यास तयार नव्हते आता या सर्वात केंद्र सरकारचा दोष नसतानाही त्यांना विरोधी पक्ष टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत .

अद्यापही भारत सरकार आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सतत पावले उचलत आहे आणि युक्रेनमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहे. भारत ANYHOW आपल्या नागरिकांना मायदेशात परत आणणारचं….

INDIA-UKRAINE: Modi govt gives repeated instructions – still does not leave Ukraine! Whose fault is it? – The Prime Minister is ready to bring them back; India ANYHOW to bring its citizens back home…. read detailed analysis…

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात