
प्रतिनिधी
अमरावती – अमरावतीत हिंसाचारानंतर संचारबंदी लावली होती. मात्र, आता सर्वत्र शांतता असल्याने संचारबंदीमध्ये शिथिलता आणि इंटरनेट सुविधा बहाल केली. त्या बद्दल भाजप नेते व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी स्वागत केले. अमरावती जिल्ह्यात अनेक वस्तीत शस्त्रसाठा असून यात तलवारी,चायना चाकू, भाले व कुऱ्हाडी आहे. त्या पोलिसांनी जप्त केल्या पाहिजेत,असे त्यांनी सांगितले.In Amravati district Weapons should be confiscated
हा शस्त्रसाठा अवैध आहे. गुन्हेगारी लोकांपासून जनतेला होणार त्रास टाळण्याची गरज आहे. गुन्हेगारांना आशिर्वाद देणे पोलिसांनी आता थांबवले पाहिजे. अवैध धंद्यातून काही प्रकार होतात असंही त्यांनी सांगितले तर अमरावतीत अनेक वस्तीत शस्त्र असल्याची धक्कादायक माहिती बोंडे यांनी दिल्यानंतर पोलिस आता काय कारवाई करतात. हे पाहणे औतुक्याचे ठरेल.
– अमरावती जिल्ह्यातील शस्त्रसाठा जप्त करावा
– संचारबंदीमध्ये शिथिलता, इंटरनेट बहालचे स्वागत
– जिल्ह्यात बेकायदा शस्त्रे जमविली आहेत
– ती ताब्यात घेण्याची पोलिसांकडे मागणी
– वस्त्या वस्त्यात छापे टाकण्याचे आवाहन
– जनतेच्या सुरक्षेसाठी कारवाई करण्याची मागणी
In Amravati district Weapons should be confiscated
Array