बांगलादेश आणि काश्मीर हिंसाचारात जर समान षडयंत्र; तर कठोर उपाययोजनेचा पॅटर्न देखील समानच पाहिजे!!


काश्मीरमध्ये हिंदू आणि परप्रांतीय यांच्या हत्याकांडात तसेच बांगलादेशातील हिंदूंच्या शिरकाण करण्यात समान षडयंत्र असल्याचे दिसून येत आहे. भारतात भक्कम केंद्र सरकार असताना, त्यातही हिंदूत्ववादी पक्ष सत्तेवर असताना आम्ही त्यांच्या पुढे झुकत नाही हे दाखवून देण्याचा धर्मांधांचा यात मनसुबा दिसतो आहे. If the same conspiracy in Bangladesh and Kashmir violence; So the pattern of drastic measures should also be the same !!

वास्तविक पाहता जम्मू काश्मीर मधून 370 कलम हटविल्यानंतर केंद्र सरकारने तिथे जी सकारात्मक विकासाची पावले टाकली आहेत त्याची दृश्य स्वरूपे आज काश्मीर मध्ये विविध ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये जम्मू-काश्मीरचे केंद्रशासित प्रशासन बदलत असलेल्या क्रॉप पॅटर्न पासून ते विविध मोठ्या विकास प्रकल्पात पर्यंतची असंख्य उदाहरणे सापडतील. काश्मीरच्या पाच जिल्ह्यांमध्ये जम्मू-काश्मीर फलोत्पादन विभागाने तिथला क्रोप पॅटर्न बदलून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट लाभ मिळवून दिले आहेत. यामध्ये केशर उत्पादनाचा क्लस्टर देखील तयार होतो आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आत्तापर्यंत जे दुर्लक्षित सामाजिक घटक होते त्या सर्व घटकांना केंद्रीय योजनांचा थेट लाभ मिळताना दिसतो आहे.



त्याच वेळी जम्मूमध्ये विविध पायाभूत सुविधा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. यामध्ये वैष्णोदेवी यात्रेकरूंसाठी तसेच अमरनाथ यात्रेकरूंसाठी मोठ्या निवासी प्रकल्पांचा देखील समावेश आहे. तीन – तीन हजार यात्रेकरूंचे निवास प्रकल्प उभे राहत आहेत. रोशनी ऍक्ट रद्द करून जम्मू-काश्मीर प्रशासनाने तिथल्या शेतकर्‍यांच्या जमिनी मोकळ्या केल्या आहेत. पायाभूत सुविधांसाठी मल्टिनॅशनल कंपन्या ते मोठे देश यांच्या पर्यंत अनेकांची गुंतवणूक सुरू आहे. आंतरराष्ट्रीय करार होत आहेत.

या पार्श्वभूमीवर विकास रोखण्याचा प्रयत्न म्हणून काश्मीरमध्ये “टार्गेट किलिंग” सुरू आहे. हे सांगायला कोणा राजकीय तज्ञ विश्लेषकायची गरज नाही.

जे काश्मीरचे तेच बांगलादेशाचे…!! सहाच महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशाचा दौरा करून तेथे बापू – वंग बंधू संग्रहालय सुरू करून दिले. दोन देशांच्या सरकारांनी मधले सौहार्द वाढले. मोदींनी बांगलादेश मध्ये जाऊन हिंदू समाजातील घटकांशी संपर्क साधला. बांगलादेशच्या शेख हसीना वाजेद सरकारने हिंदूंसाठी काही योजना आखल्या. या योजनांना खोडा घालण्यासाठी आणि दोन सरकारांमधले सौहार्द संपवण्यासाठी बांगलादेशातील धर्मांध एलिमेंट्स सध्या ऍक्टिव्हेट झाली आहेत आणि त्यातूनच दुर्गा पूजेवर हल्ले, हिंदूंचे शिरकाण, हिंदू समाजाच्या घरांची पेटवापेटवी हे सगळे सुरू झाले आहे.

काश्मीर आणि बांगलादेश इथे मोठ्या ऑपरेशनची गरज आहे. केंद्र सरकारची ती तयारी आहे. बांगलादेश सरकारला त्यासाठी तयार करावे लागेल. हे आव्हान मोदी सरकारने पेलण्याची गरज आहे. कारण या सरकारच्या इच्छाशक्तीसारखी भारतात दुसऱ्या कोणत्या सरकारची तशी इच्छाशक्ती नसल्याचेच इतिहास दर्शवितो. जर काश्मीर आणि बांगलादेश यांच्यातील हिंसाचाराचा धर्मांध पॅटर्न समान असेल, तर त्यावरच्या कठोर उपाययोजनेचा पॅटर्न देखील तितकाच समान आणि दीर्घकालीन असला पाहिजे ही अपेक्षा आहे.

If the same conspiracy in Bangladesh and Kashmir violence; So the pattern of drastic measures should also be the same !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात