HIJAB CONTROVERSY : हिजाब-बॉलिवूड WAR ! जय श्री राम म्हणणारे भेडिये-स्वरा भास्कर ; ते तर गुंड-जावेद अख्तर ;हिंमत असेल तर अफगाणिस्तानात बुरखा न घालता राहून दाखवा-कंगना

HIJAB CONTROVERSY : हिजाबवर बॉलिवूड वार ! जय श्री राम म्हणणारे भेडिये-स्वरा भास्कर ; ते तर गुंड-जावेद अख्तर ;हिंमत दाखवायची असेल तर अफगाणिस्तानमध्ये बुरखा न घालता राहून दाखवा-कंगना


विशेष प्रतिनिधी

मुंबई: हिजाब वादावरून आता बॉलिूडमध्ये दोन गट पडले आहेत .स्वरा भास्कर ने जय श्री राम घोषणा देणाऱ्या मुलांना भेडीये म्हणत ट्विट केले तर जावेद अख्तर यांनी भगवे रुमाल परिधान करणाऱ्यांना गुंड म्हंटले आहे .तर दुसरीकडे क्विन कंगना म्हणाली हिंमत असेल तर अफगाणिस्तानमध्ये बुरखा न घालता राहून दाखवा.
HIJAB CONTROVERSY: Hijab – Bollywood War! Bhediye-Swara Bhaskar , if you want to show courage, then show it without wearing HIJAB in Afghanistan – Kangana

 

कंगना रणौतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लेखक आनंद रंगनाथन यांच्या पोस्टचा स्क्रिनशॉर्ट शेअर केला आहे. या फोटोमध्ये इराणच्या बदललेल्या परिस्थितीची झलक दाखवणारे दोन फोटो शेअर केले आहे. त्यातील पहिला फोटो हा १९९७ सालचा आहे. ज्यात इराणी महिला बिकीनी घालून आहेत आणि आताच्या महिला बुरखा परिधान केलेल्या आहेत. १९७३चा इराण आणि आताचा इराण असे म्हणत आनंद रंगनाथन यांनी हा फोटो शेअर केला आहे.

आनंद रंगनाथन यांनी शेअर केलेल्या फोटोवर कंगनाने म्हटले आहे की, ‘जर हिंमत दाखवायची असेल तर अफगाणिस्तानमध्ये बुरखा न घालता राहून दाखवा. आधी स्वत:ला पिंजऱ्यातून मुक्त करायला शिका’.

बॉलिवूड स्टार्सही यात मागे नाहीत. आत्तापर्यंत रिचा चड्डा, जावेद अख्तर यांसारख्या अनेक स्टार्सनी या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यातच आता या एपिसोडमध्ये बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिध्द ‘पंगा गर्ल’ कंगना रणावतही (Kangana Ranaut) सामील झाली आहे. कंगना देशात सुरु असलेल्या प्रत्येक मुद्द्यावर उघडपणे बोलते. आता हिजाबवरुन सुरु असलेल्या वादावर कंगनाने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

वास्तविक, कंगनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे, जी लेखक आनंद रंगनाथन यांच्या पोस्टचा स्क्रीनशॉट आहे. या पोस्टमध्ये बदलत्या इराणची झलक दाखवली आहे. पहिल्या फोटो 1997 मध्ये इराणी महिला बिकिनीमध्ये दिसत आहेत आणि आता महिला बुरखा घातलेल्या दिसत आहेत. या फोटोसोबत 1973 चा इराण आणि आताचा इराण असे लिहिले आहे. तिच्या इन्स्टा स्टोरीवर आनंद रंगनाथन यांच्या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर करत कंगनानेही या प्रकरणावर आपले मत व्यक्त केले आहे. कंगनाने म्हटल की, ‘हिंमत दाखवायची असेल तर अफगाणिस्तानात बुरखा न घालून दाखवा… स्वतःला पिंजऱ्यातून मुक्त करायला शिका.’

 

हे गुंड… जावेद अख्तर

जावेद अख्तर यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देणारे ट्विट केले होते. यात त्यांनी म्हटलं होत की, ‘मी कधीच हिजाबच्या बाजूने नव्हतो. मी अजूनही त्या पाठीशी उभा आहे, त्याचवेळी मुलींच्या त्या लहान गटाला धमकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंडांचा मी निषेध करतो. हे त्यांचे “पुरुषत्व” आहे का? खेदाची गोष्ट आहे.’

हे तर भ्याड…. रिचा चढ्ढा

त्याचवेळी रिचा चढ्ढा म्हणते ‘तुमच्या मुलांची प्रगती चांगल्या पद्धतीने करा. एकाद्या विद्यार्थिनीवर भ्याडांच्या झुंडीने हल्ला केला जात आहे. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. येत्या काही वर्षांत हे सर्व बेरोजगार, हताश आणि गरीब होतील. अशांबद्दल सहानुभूती नाही, मोक्ष नाही. अशा घटनांवर मी थुंकते.’

HIJAB CONTROVERSY: Hijab – Bollywood War! Bhediye-Swara Bhaskar , if you want to show courage, then show it without wearing HIJAB in Afghanistan – Kangana

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात