GRAND WELCOME : विजयश्री घेऊन परतले भारताचे वीर ! विमानतळावर जंगी स्वागत ; पहा VIDEO


  • भारताने यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत 7 पदकं पटकावली यामध्ये 4 कांस्य, 2 रौप्य आणि एका सुवर्णपदकाचा समावेश आहे .

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा जुलै मध्ये सुरू झाली होती .आता ही स्पर्धा संपली आहे. त्यामुळे सर्व देशांचे खेळाडू टोक्योमधून (Tokyo Olympics 2020) आपआपल्या घरी परतू लागले आहेत. भारताचा हॉकी संघ आणि एथलेटिक्स संघ देखील नुकताच भारतात परतला आहे. एथलेटिक्स संघाती सदस्य 9 ऑगस्ट रोजी टोक्योतून नवी दिल्लीला पोहोचले. तर भारताची पुरुष आणि महिला हॉकी टीम देखील परतली.GRAND WELCOME: India’s hero returns with victory! Welcoming welcome at the airport; WATCH VIDEO

दोन्ही संघ एकाच दिवशी आले असले तरी एथलेटिक्स संघ दुसऱ्या आणि हॉकी संघ दुसऱ्या विमानातून प्रवास करत होता. पण अखेऱ एकाच विमानतळावर पोहोचल्यावर तेथे उपस्थितांनी खेळाडूंचे जंगी स्वागत केलं.

 

यावेळी सर्व खेळाडूंना फुलांची माळ घालत त्यांचा गौरव केला. उपस्थित नागरिक जोरजोरात घोषणा देत जल्लोष करत होते.

 

टोक्योमध्ये भारताला मिळालेल्या सात पदकांत भालाफेक खेळात नीरज चोप्राला सुवर्णपदक, वेटलिफ्टर मिराबाई चानू आणि पैलवान रवी दहियाला रौप्य पदक मिळालं. तर बॅडमिंटपटू पीव्ही सिंधू आणि पैलवान बजरंग पूनियासह बॉक्सर लवलीना बोरगोहेनला कांस्य पदक मिळालं. याशिवाय सांघिक खेळात भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्य पदकावर नाव कोरलं.

 

GRAND WELCOME: India’s hero returns with victory! Welcoming welcome at the airport; WATCH VIDEO

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात