किल्ले-जिहाद : सदैव ‘चित्ती’ सावध असावे ! दुर्गराज रायगड…मदार मोर्चा वर हिरवा रंग-चादर ; संभाजीराजेंनी हाणून पाडला डाव-पुरातत्त्व विभागाची कारवाई

  • रायगडावर प्रार्थनास्थळ उभारण्याचा प्रयत्न संभाजीराजेंनी हाणून पाडला.
  • पुरातत्त्व विभागाची कारवाई
  • Fort-Jihad: Always be careful! Durgaraj Raigad … Green sheets on Madar Morcha; Sambhaji Raje taken the action

विशेष प्रतिनिधी

रायगड:छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर हिरवी रंगरंगोटी करून आणि चादर पसरवून कब्जा करण्याचा प्रयत्न खासदार संभाजीराजेंनी हाणून पाडला आहे. रायगडावर  किल्ले-जिहादचा प्रयत्न काही अज्ञात व्यक्तींनी केल्याची माहिती किल्ले प्रेमी आणि शिवप्रेमींनी छत्रपती संभाजीराजेंना दिली होती.

 

त्यानंतर संभाजीराजे यांनी पुरातत्त्व विभागाला एक पत्र लिहिलं. तसंच असा प्रयत्न होतो आहे त्याबाबत योग्य कारवाई केली गेली पाहिजे अशी मागणी केली.

यानंतर लगेचच पुरातत्त्व विभागाने कारवाई करून धार्मिक स्थळ उभारण्याचा प्रय़त्न हाणून पाडला. तसंच रायगडावरचं ते ठिकाण पूर्ववत केलं. या ठिकाणी आता सुरक्षा रक्षकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत संभाजीराजेंनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे.

 

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2055011264657082&id=136216326536595&sfnsn=wiwspwa

 

काय आहे संभाजीराजेंचं पत्र?

दुर्गराज रायगडावरील ‘मदार मोर्चा’ येथे घडत असलेल्या प्रकाराबद्दल पुरातत्व विभागास पत्र दिले….

महोदय,

किल्ले रायगड येथील ‘मदार मोर्चा’ या ठिकाणी काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी रंगरंगोटी करून चादर घालून तिथे प्रार्थनास्थळ करण्याचा प्रयत्न केल्याचे अनेक शिवभक्तांनी याबाबत आमच्याशी संपर्क साधून निदर्शनास आणून दिले आहे.

ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाच्या नियमांमध्ये या गोष्टी प्रतिबंधित असताना, किल्ले रायगड सारख्या ऐतिहासिक ठिकाणी अशा गोष्टी होणे अतिशय चुकीचे आहे.

किल्ले रायगडचे पावित्र्य व ऐतिहासिक महत्त्व अबाधित राहावे यासाठी मदार मोर्चा याठिकाणी करण्यात आलेली रंगरंगोटी हटवून तिथे कोणत्याही प्रकारचे नवीन बांधकाम अथवा रचना करण्यास तात्काळ पायबंद घालण्यात यावा.

– संभाजी छत्रपती

 

Fort-Jihad: Always be careful! Durgaraj Raigad … Green sheets on Madar Morcha; Sambhaji Raje taken the action

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात