• Download App
    १८ हजार कॅसेटचा संग्रह; नामांकित लोकांचा आवाज असलम खान यांनी जोपासला कॅसेट रेकॉर्डिंगचा छंद Collection of 18,000 cassettes; The voices of Leadres

    १८ हजार कॅसेटचा संग्रह; नामांकित लोकांचा आवाज असलम खान यांनी जोपासला कॅसेट रेकॉर्डिंगचा छंद

    वृत्तसंस्था

    यवतमाळ : जगातील कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तीचे भाषण संदेश, मुलाखत किंवा अन्य कोणतेही संदर्भ तातडीने हवे असल्यास एक कॅसेटची अफलातून लायब्ररी यवतमाळ जिल्ह्यात दिग्रस तालुक्यातील कांदळी गावात आहे.Collection of 18,000 cassettes; The voices of Leadres

    असलम खान, असे अवलीया लायब्ररीचे नाव आहे. त्यांच्याकडे जगातील आकाशवाणीवरून प्रसारीत झालेल्या तब्बल अठरा हजारांवर ध्वनीमुद्रिका संग्रहित आहेत. त्यात50 हजार लोकांचा आवाज संग्रही आहे. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जॉन केनेडीपासून ओसामाबिन लादेनचाही आवाज, भाषण संग्रही आहे. बीबीसी लंडन, व्हॉईस ऑफ अमेरिका, व्हॉईस ऑफ जर्मनी, आकाशवाणी मुंबईसह अनेक रेडिओ स्टेशनवरून प्रसारीत झालेल्या जगभरातील नेत्यांच्या भाषणाच्या १८ हजारांवर कॅसेट संग्रहित आहेत.

    शिक्षकी पेशातून निवृत्त झालेल्या असलम खान यांनी १९९२ अर्थात तब्बल २९ वर्षांपासून छंद जोपासला असून, आताही अडचणीवर मात करून त्यांनी कधीही खंड पडू दिला नाही. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,जॉन केनेडी, नेल्सन मंडेला, महाराणी एलिझाबेथ, राजकुमारी डायना, दलाई लामा, मदर तेरेसा, सद्दाम हुसेन, इंदिरा गांधी, राजीव गांधी आदी मोठ्या नेते, व्यक्तीमत्त्वांसह ओसामा बिन लादेनसारख्यांच्या भाषणाचा संग्रह आहे. असलम खान यांनी आजपर्यंत हजारो कार्यक्रम कॅसेटमध्ये रेकॉर्ड करून ठेवले आहेत.

    – १८ हजार कॅसेटचा संग्रह;नामांकित लोकांचा आवाज

    – जगातील कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तीचे भाषणे

    – सेवानिवृत्त शिक्षक असलम खान यांचा संग्रह

    – आजपर्यंत हजारो कार्यक्रम कॅसेटमध्ये रेकॉर्ड

    – २९ वर्षांपासून छंद जोपासला

    Collection of 18,000 cassettes; The voices of Leadres

    Related posts

    पुरोगामी महाराष्ट्राच्या नुसत्याच तोंडी वाफा; दुसऱ्या टप्प्यात मतदारांनी घरात काढल्या झोपा!!; वाचा मतदानाचा आकडा!!

    नाही सुचल्या नव्या आयडिया, एकमेकांच्या कॉप्या हाणा; ठाकरे + पवारांच्या प्रचाराची तऱ्हा!!

    पवार म्हणतात, भाजप नको, दादांसकट सगळे चालतील, पण पवार भाजपला का घाबरतात??; आणि ते फक्त भाजपलाच घाबरतात का??