विशेष प्रतिनिधी
मुंबई: यंदा दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने जाहीर करण्यात आला यानंतर 11 वीच्या प्रवेशाची प्रकिया ही 16 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. प्रवेश प्रक्रियेपूर्वी सीईटी घेतली जाणार आहे. Class 11th admission: Eleventh admission process from 16th August: CET will have to be given; Read What are the criteria for admission?
16 ऑगस्टपासून अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश परीक्षा सुरू होणार आहे. राज्यातील मुंबई महापालिका आणि तसंच पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका यांच्या क्षेत्रातील अकरावीचे प्रवेश अर्ज हे ऑनलाईन असणार आहेत. सीईटी परीक्षेच्याआधी अर्जाचा पहिला भाग आणि परीक्षा झाल्यानंतर दुसरा भाग भरता येणार आहे.
ऑनलाइन प्रवेशाची पुर्व तयारी-
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सरावाठी 13 ऑगस्टपासून तात्पुरती नोंदणी करता येणार आहे. सीईटी परीक्षेपूर्वी अर्जाच्या पहिला भागात विद्यार्थ्यांना प्राथमिक माहिती त्यासोबत शुल्क भरुन अर्ज लॉक करायचा आहे. सीईटी परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सीईटीचे गुण आणि पसंती क्रमांक यासाठी अर्जाचा दुसरा भाग भरायचा आहे. या संदर्भातलं वेळापत्रक काही दिवसांमध्ये संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
राज्य मंडळाने जाहीर केलेल्या निकालात 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामुळे अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जाची संख्या पाहता सुमारे पाच लाख विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी अर्ज भरला नसल्याचे दिसून येत आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक 2 लाख 55 हजार 643 अर्ज मुंबई विभागातून भरले गेले आहेत, तर सर्वात कमी 20 हजार 566 अर्ज कोकण विभागातून भरले गेले आहेत.
मुंबई खालोखाल पुणे विभागातून 1 लाख 32 हजार 255 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. तर 2 हजार 734 अर्ज जुन्या विद्यार्थ्यांचे आहेत. राज्य मंडळाकडून आता परीक्षेच्या आयोजनाची तयारी सुरू करण्यात आली आहे.
कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी निकष काय?
१) CET परीक्षेच्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार महाविद्यालयांमध्ये प्रवेश
२) CET परीक्षा देणाऱ्यांना 11 वी प्रवेशप्रक्रियेत प्राधान्य
३) त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश
४) CET परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन इयत्ता १० वीच्या पद्धतीनुसार
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App