विशेष प्रतिनिधी
मुंबई : मेट्रो प्रकल्पात राज्य सरकारइतकाच निधी केंद्र सरकारचा सुद्धा आहे.केंद्राच्या मदतीने JICAने या प्रकल्पाला वित्तपुरवठा केला आहे. मुंबईकरांच्या हितासाठी केंद्र सरकारने यापूर्वीसुद्धा महाराष्ट्राला सहकार्य करण्याची भूमिका घेतली; यापुढे सुद्धा सहकार्याचीच भूमिका केंद्र सरकारची असेल, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले. central govt has same share of expenditure in metro, reminds devendra fadanvis
आरेच्या जागेला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. आरेची जागा अंतिम झाल्यानंतर काम सुद्धा बरेच पुढे गेले आणि 100 कोटी रुपयांचा खर्चही झाला. लोकशाहीत चर्चेला आमची कायमच तयारी असते आणि चर्चेतून मार्गही निघतो.
फडणवीस म्हणाले, की आमची एकच विनंती आहे की, आता दुराग्रह सोडून द्यावा आणि मुंबईकरांच्या हितासाठी आरेच्या जागेवर कारशेडचा मार्ग तत्काळ प्रशस्त करावा.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App