Breaking News: NCB चा मोठा खुलासा ; आर्यन खान 4 वर्षांपासून करत होता ड्रग्सचं सेवन ; आर्यन शाहरुखला फोनवर बोलला


विशेष प्रतिनिधी

मुंबई: मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ड्रग्स पार्टीत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने त्याला रविवारी अटक केली आहे. तेव्हापासून ड्रग्ज प्रकरणात त्याची चौकशी केली जात आहे. चौकशी आर्यन खान हा पूर्णपणे हतबल झाला आहे. या चौकशीत आर्यनने कबूल केलं आहे की, तो तब्बल 4 वर्षापासून ड्रग्सचं सेवन करत होता. दरम्यान, चौकशी सुरु असताना आर्यनला आपले अश्रू आवरता येत नव्हते आणि तो वारंवार रडत होता.Breaking News: Big revelation in NCB inquiry; Aryan Khan had been using drugs for 4 years

शाहरुखसोबत आर्यनची फोनवरुन बातचीत

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खानने त्याचा मुलगा आर्यनशी फोनवर बोलला आहे. आर्यनच्या अटकेनंतर, कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून, एनसीबीने आर्यनला त्याचे वडील शाहरुख खानशी त्यांच्या लँडलाईन फोनवरून सुमारे 2 मिनिटे बोलण्यास परवानगी दिली होती.

देशाबाहेर असतानाही केलं आहे ड्रग्सचं सेवन

एनसीबीच्या चौकशीत असे उघड झाले की, आर्यन हा तब्बल 4 वर्षांपासून ड्रग्जचे सेवन करत आहे आणि आर्यनने भारताबाहेर म्हणजेच यूके-दुबई किंवा इतर देशांमध्ये ड्रग्जचे सेवन केले आहे. त्यामुळे आता हे प्रकरण अधिकच गंभीर झालं आहे. यामुळेच NCB कडून सातत्याने आर्यनची वेगवेगळ्या प्रकारे चौकशी सुरु आहे.Breaking News: Big revelation in NCB inquiry; Aryan Khan had been using drugs for 4 years

यापूर्वी, एनसीबीने क्रूझमधील त्यांच्या छाप्याबद्दल आणि तेथून जप्त केलेल्या ड्रग्सबाबात निवेदन जारी केले होते. एनसीबीने टिपच्या आधारावर क्रूझवर कारवाई केली होती. एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी आरोपींकडून 13 ग्रॅम कोकेन, 5 ग्रॅम एमडी, 21 ग्रॅम चरस, एमडीएमए (एक्स्टसी) च्या 22 गोळ्या आणि 1.33 लाख रुपये जप्त केले आहेत. .

त्याचवेळी, एका लेखी निवेदनात आर्यन खानने आपला अटक मेमो स्वीकारताना असे म्हटलं आहे की, ‘मला माझ्या अटकेची कारणे समजली आहेत आणि माझ्या कुटुंबीयांना त्याबद्दल कळवले आहे.’

आर्यन ड्रग्स विक्रेत्यांच्या संपर्कात असल्याचा NCB ला संशय
एनसीबीने या प्रकरणातील आर्यन, अरबाज मर्चंट आणि इतर आरोपींचे फोन जप्त केले आणि सर्व चॅट्स तपासले आहेत. त्या तपासात आर्यन अनेक ड्रग पेडलर आणि ड्रग सप्लायर्सच्या संपर्कात असल्याचं NCB कडून सांगण्यात येत आहे.

Breaking News: Big revelation in NCB inquiry; Aryan Khan had been using drugs for 4 years

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण