
वृत्तसंस्था
पाटणा : जनता दल यूचे 17 आमदार पक्षांतर करून राष्ट्रीय जनता दलात सहभागी होण्याची शक्यता बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयू नेते नितीश कुमार यांनी फेटाळली आहे. Bihar CM and JD(U) leader Nitish Kumar on RJD leader Shyam Rajak’s claim
आरजेडी नेते श्याम रजक यांनी जदयूचे 17 आमदार आरजेडीच्या वाटेवर असल्याचा दावा करून बिहारच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. परंतु हा दावा नितीश कुमार यांनी फेटाळून लावला आहे.
जदयूचे 17 आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि कोणत्याही वेळी ते आमच्या पक्षात येण्यास तयार आहेत, असे श्याम रजक यांनी सांगून खळबळ उडवून दिली होती. एंटी-डिफेक्शन कायद्याचे उल्लंघन करायचे नसल्याने आम्ही त्यांना सांगितले आहे.
Bihar CM and JD(U) leader Nitish Kumar on RJD leader Shyam Rajak’s claim
त्यांचे पक्षात स्वागतच केले जाईल. परंतु त्यांनी आमदारांची संख्या आणखी वाढवावी. जर 28 आमदारांचा गट झाल्यावर आम्ही त्यांचे स्वागत करू. त्यांची संख्या लवकरच वाढून 28 होतील, अशी अपेक्षा आरजेडी नेते श्याम रजक यांनी व्यक्त केली आहे.
ArrayThese kind of claims are totally baseless: Bihar CM and JD(U) leader Nitish Kumar on RJD leader Shyam Rajak's claim that 17 JD(U) MLAs want to join RJD https://t.co/DGt9x6df1e pic.twitter.com/7SSBY28CBo
— ANI (@ANI) December 30, 2020