एक कथा: महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना.. लाव रे तो व्हिडिओ …शरद पवार यांना गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना संपवायचेच आहे…1 लाख 1 टक्के….

फडणवीसांच स्टिंग ऑपरेशन…

साक्षीदारापासून ते पुराव्यांपर्यंत सारे कसे मॅनेज केले जाते आहे, याचा संपूर्ण लेखाजोखाच देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत एका स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून सादर केला.A story: Mahavikas Aghadi’s Mahakattalakhana .. Laav Re to video … Sharad Pawar has to finish Girish Mahajan and Devendra Fadnavis … 1 lakh 1 percent ….


विशेष प्रतिनिधी

मुंबई :महाविकास आघाडीचे अनेक नेते एका सरकारी वकिलाच्या माध्यमातून भाजपाच्या अनेक नेत्यांचा सूड उगविण्याचे कसे षडयंत्र रचत आहेत, साक्षीदारापासून ते पुराव्यांपर्यंत सारे कसे मॅनेज केले जाते आहे, याचा संपूर्ण लेखाजोखाच माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत एका स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून सादर केला.A story: Mahavikas Aghadi’s Mahakattalakhana .. Laav Re to video … Sharad Pawar has to finish Girish Mahajan and Devendra Fadnavis … 1 lakh 1 percent ….

फडणवीसांनी विधानसभेत सादर केलेल्या एका व्हिडीओत पवारांना १ लाख १ टक्के फडणवीस आणि महाजनांना संपवायचंय असा बोलल्याचा उल्लेख आहे.

संजय राऊत यांनी नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत  एक मोठा राजकीय बॉम्ब फोडला आहे. जळगावमधील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या संबंधित प्रकरणात भाजप आमदार गिरीश महाजन यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी पोलिसांना मदत केल्याचा आरोप फडणवीसांनी विधानसभेत केला आहे. फडणवीसांनी केलेले हे सगळे आरोप भाजपने महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना अशा नावानेच प्रसिद्ध केला आहे. …लॉ रे तो व्हिडिओ म्हणत तब्बल ३५ व्हिडिओ त्यांनी pendrive च्या माध्यमातून दाखवले…

एक कथा: महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना

ही एक दीर्घ कथा आहे, विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण यांची. कथा फार मोठी असली तरी थोडक्यात समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. या कथानकात पात्र अनेक आहेत, किमान 25-30 वेगवेगळ्या वेबसीरीज तयार होतील इतके प्रचंड प्रोटेन्शियल आहे.

आणि या कथेचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही कथा सत्य घटनेवर आधारित आहे.

(व्हीडिओ 1)

वकिलांचा संवाद : आम्हाला पैसा निलेश पुरवायचा, गुंडागर्दी करणे, दहशत पसरविणे असे सांगायचे आहे.

ड्रग्जचा व्यवसाय करतो, हे तो सांगेल का? असे सांगितले तरच मोक्का लागेल. सट्ट्याच्या पैशातून मोक्का लागत नाही. पण, सट्ट्याच्या पैशातून ड्रग्ज म्हटले की मोक्का लागेल. 1 ग्रॅमला लाख रूपये मिळतात, असे सांगायचे.

(व्हीडिओ 2)

तो गिरीश महाजन यांचे नाव घ्यायला तयार आहे ना? एक छोटा जबाब तयार करतो. तो माफीचा साक्षीदार व्हायला तयार आहे का?

ड्रग्जचे नाव घेतले की, आपला मोक्का एकदम फिट बसतो.

आणि ड्रग्ज सापडलेच पाहिजे, असे कुठे आहे? सापडले तरच गुन्हेगार असतो, असे नाही. केवळ संशय क्रिएट करणे पुरेसे.

शिक्षण संस्था आहे, तेथे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मार्केट खूप मोठे आहे, असे सांगायचे. त्याला पैसे दिले आहेत ना आपण?

सुनील गायकवाड, महेंद्र बागुल, सूर्यवंशी. रवि शिंदेने त्याचे नाथाभाऊंशी बोलणे करून दिले.

संस्था आपल्या ताब्यात आहे तोवर कोट्यवधी रुपये कमवू शकतो, असे भासवायचे.

(व्हीडिओ 8)

– सारे जबाब मी लिहून दिले होते, त्यांनी हरवून टाकले. सगळा गोंधळात गोंधळ करून टाकला.

– पवार साहेबांनी डीजींना सांगितले. किती मिटिंगा झाल्या. सीपी ला रात्रभर बसविले. पवार साहेब यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला होतो. मी मागच्या दारातून गेलो. त्यांनी फोन लावले. मी गाडीत बसलो, तर लगेच डीजी चा फोन आला. सीएम, अजितदादा/वळसे पाटील/एसीएस, डीजी होते. सीपीला रात्रभर बसवून ठेवले. रजत नागपूरला निघून गेला. मग सीपीचे फोनवर फोन आले.

– सर्व निगेटिव्ह होते. मी कॉपी दिली. शेवटी पवार साहेबांना सांगून अधिकारी बदलविला. अनिल देशमुख असते, तर फायदा झाला असता. प्रवीण चव्हाण आला तर त्याला अँटीचेंबरला बसवा, असे पवार साहेबांचे ऑर्डर होते. अनिल देशमुखांचे माझ्याशिवाय पान हलायचे नाही.

(व्हीडिओ 9)

– अजित पवार सपोर्ट करीत नाही. पर बडे साब सब देख रहे है. कोणी चांगले अधिकारी आहेत का? चार/पाच अधिकार्‍यांची चांगली नावे असेल तर द्या, असे त्यांनी मला सांगितले.

(व्हीडिओ 18)

– अ‍ॅड. प्रवीण चव्हाण हे कट कसा रचत आहेत, याचे एसीपी सुषमा चव्हाण यांच्याशी झालेले संभाषण

– रेडमध्ये सहभागी होणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांची संपूर्ण व्यवस्था ते सांगत आहेत. कुठल्या मार्गाने जायचे आणि काय काय करायचे, याची सूक्ष्म व्यवस्था सरकारी वकिलांनी ब्रीफ केली आहे. अगदी सरकारचे रेस्टहाऊस सुद्धा बुक करून दिले आहे. वेज/नॉन-वेज जेवणापर्यंत सूक्ष्म नियोजन

– जेवणाची/राहण्याची आणि रूम कुणाच्या नावाने बुक करायच्या, कॅशमध्ये कसे पैसे द्यायचे, याची संपूर्ण कथा ते सांगत आहेत.

– यासाठी कोणती मदत लागली तर खडसे साहेबांची मदत घ्या, असेही निर्देश दिले आहेत. खडसे साहेब सर्व पैसे देतील, असेही त्यांनी सांगितले.

(व्हीडिओ 10)

– त्याला ब्लड लावून ठेवले असते आणि चाकू जप्त केला असता.

एक चाकू विकत घ्यायचा आणि जोवर चर्चा सुरू आहे, तोवर तेथे फेकून द्यायचा. जप्त करायला काय लागते?

– किती जणांनी माझे नाव या केससाठी रेकमंड केले?

दिलीप बोरले, वळसे पाटील, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अर्जून खोतकर, अनिल देशमुख, रमेश जाधव, गुलाबराव, हसन मुश्रिफ, श्रीनिवास पाटील यांची नावे घेत, त्यांची पत्र मोबाईलवर दाखवितात.

या सर्वांनी पवारांना पत्र दिले.

– गिरीश महाजन अटकत नाही. सीपीला काढल्याशिवाय पर्याय नाही. डीजीला भेटणार आहे. नाव घेत नव्हते.

(व्हीडिओ 11)

– साहेबांना फोन करून मिटिंग लावली. मोक्कासाठी ऐकायला तयार नव्हते. 1 दिवसांत एफआयआर ड्राफ्ट करून दिला. स्वत: अभ्यास करून कलमं लावली.

– अनेक कलमं लावली. पण त्यांनी पॅरेच्या पॅरे गहाळ केली.

(व्हीडिओ 19)

विजू पाटीलशी दूरध्वनी संवाद

– गिरीश महाजनचे नाव टाका. मी जबाब तयार करतो.

– पुढे काय बोलायचे, स्टेटमेंटमध्ये काय टाकायचे, हे सारे निर्देश देतो आहे. भोईटे जाईल, तेव्हा आपला माणूस जाईल आणि तेथे ऐवज ठेऊन देईल.

– कुणाकडून काय जबाब घ्यायचे, हेही समजावून सांगितले आहे.

(व्हीडिओ 20)

एसीपी सुषमा चव्हाण, पौर्णिमा गायकवाड, अ‍ॅड. प्रवीण चव्हाण संभाषण

– हॉटेलचे बिल देऊ नका, 10 हजार दिले आहेत.

– तेथे आपला माणूस ठेवा. तो दोन फाईलमध्ये गिरीश महाजन यांचे फोटो ठेवायचे आहे.

– पंचांची नावे मी व्हॉटसअ‍ॅपवर पाठवितो.

– दोन सायबर एक्सपर्ट ठेवा. ती आपली माणसं असतील.

– जे आपल्याला माहिती आहे, ते पोलिसांना कुठे माहिती आहे. दोन टेक्नीशियन सोबत ठेवायचे आणि ते ऐवज ठेवून देतील.

(व्हीडिओ 21)

एसीपी सुषमा चव्हाण यांच्यासोबत फोन कॉल

– पंचनामा मॅनेज करा, की 6.30 वाजता ऑर्डर मिळाली पाहिजे.

– डीडीआर ओळखीचा असेल तर बोलाविणे.

– जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद अशा ठिकाणांहून 5 पंच लागतील. उद्या रविवार असल्याने ओळखीची माणसं आधीच ठरवून घ्या.

– वकिल स्वत:च फोन करून माणसं ठरवितात. काही बोलू नका. कारण मॅटर सेंसेटिव्ह आहे. फक्त शिपाई आयडेंटिफाय करून ठेवा.

(व्हीडिओ 23)

विजू पाटीलशी संभाषण

– अशी बातमी लीक करा, की अलका पवार आणि इतर डायरेक्टर यांच्यावरही रेड पडणार आहे आणि स्टे व्हॅकेट झाला आणि अटक होणार आहे, अशी सुद्धा बातमी पसरवा. त्यामुळे मेंटालिटी खराब होईल.

– वीरेंद्र भोईटेला माफीचा साक्षीदार करायचे असेल तर वकिल लावावा लागेल. तो होत असेल तर आपण त्याला मदत करू.

विजू पाटील शी संभाषण

– चॅनेलला बोलावून सर्व दाखवा. त्यांना काय दाखवायचे ते सांगा.

– गिरीश महाजन यांच्या पापाचा घडा भरला आहे, असे सांगा.

– मागच्या भागात शिवाजी भोईटेने फोटो फेकले असतील, ते दाखवायला सांगा.

(व्हीडिओ 22)

कुठल्यातरी मॅडमशी संवाद

– पवारसाहेबांकडे खडसे साहेबांना घेऊन जातो. मी, जयंत पाटील असे अजितदादांकडे जातो. मी स्वत: येणार नाही. कारण, मी आलो तर मी राष्ट्रवादीचा वकील आहे, याचा पुरावा मिळेल.

(व्हीडिओ 3)

या घटनेप्रमाणे साक्षीदार तयार करावे. गिरीश महाजनचे नाव घ्यायला सांगा. रामेश्वर आणि गिरीश महाजनचे नाव घ्या. सर्व जबाब वाचून काय अ‍ॅड करायचे ते करा.

(व्हीडिओ 12)

– कुणाला अटकवायचे? जयकुमार रावल, गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस, संजय कुटे, मुनगंटीवार

नागपूरहून मला फोन आला. पुढच्या आठवड्यात कुठे आहे, असे विचारले. मुंबईला केव्हा येणार? शुक्रवारी ये.

मी गेलो, तेव्हा पीएस राऊत तेथे नव्हता. त्याने दुसर्‍याचा नंबर दिला.

मी जातो मंत्रालयात तेव्हा कधीच माझी एन्ट्री नसते. ना जाण्याची-ना येण्याची. चर्चा केली.

(व्हीडिओ 14)

– मी सारे काही टाईप करून दिले. त्यांना फक्त ए4 वर टाईप करायला सांगितले. खंडणीचे सुद्धा मी तयार करून दिले. सुनील गायकवाड पुण्यात केव्हा आला, याची माहिती काढली. मग एफआयआरमध्ये लिहिले. 2 लाख कुठे दिले, 3 लाख कुठे दिले? मग आपण काय काय दाखविले.

किमया हॉटेल दाखवायचे होते. पण, उद्या कायद्यात अडकू नये, म्हणून कुठे कॅमेरे तर नाही ना हे आधीच बघून आलो. उगाच रिस्क नको. संपूर्ण सर्वे केला.

(व्हीडिओ 25)

– कोणत्या दिवशी किडनॅप केले ते सांगा, असा प्रश्न विचारला तर सांगायचे पहिल्या आठवड्यात. तारीख कशाला सांगायची? काही भाग गिरीश महाजनला कळला, तर त्याने एफआयआर कॉपी मागवून घेतली. स्टे घेतला. आता प्रयत्न करतात.

मी कधी कुठे दिसतो का? मी एकतर सकाळी जातो किंवा रात्री उशीरा. माझी एक जरी क्लिप हाती आली तरी हे कळून जाईल की हे सारे पवार साहेबांच्या सांगण्यावरून होते आहे.

(व्हीडिओ 24)

– गिरीश महाजन पुण्यात केव्हा आला, ती माहिती आपण घेतली. मंत्रालयातून काढली.

– अनिल देशमुख घाबरत नव्हते. त्यांना टार्गेट दिले की ते करायचे. जयंत पाटील/खडसे चांगले संबंध. त्यांनी डायरेक्ट सांगितले होते की, चव्हाण आला की पाहून घ्यायचे.

– फडणवीस गेला तर एक मतदारसंघ अनिल देशमुखच्या मुलासाठी मोकळा झाला असता. पैसा खूप लागतो एका स्टेजनंतर

– आपले टार्गेट कोण कोण आहेत?

देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, जयकुमार रावल, सुभाष देशमुख, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे.

फाईली तयार आहेत. हेच आपले टार्गेट आहे.

(व्हिडिओ 13)

– साहेब कधीच पिक्चरमध्ये येत नाहीत. ते कुणाला तरी घरी बोलावून सांगतात. थेट फोन केला तर उगाच स्टेशन डायरीत नोंद नको.

पण, शरद पवार यांना संपवायचेच आहे, गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना. 1 लाख 1 टक्के.

गिरीश महाजन आणि फडणवीस यांना अडकवणारच. पुढच्यावर्षीपर्यंत काढायचेच आहे. म्हणजे मग फडणवीस संपतो.

(व्हिडिओ 16)

– अनिल देशमुखांनी बदल्यांमध्ये पैसे कमाविले. 100 कोटींपेक्षाही अधिक. किमान 250 कोटी तरी.

– नुसते बदल्यांमध्ये नाही, तर वाहन खरेदी, बांधकामाचे टेंडर भरपूर मार्ग असतात.

2 वर्षांत 250 कोटी रुपये तरी कमविले असतील.

काय लागतं. मुंबईत 100 तरी मोठे बिल्डर्स आहेत. प्रत्येकाने 2/3 कोटी दिले तरी 200-300 कोटी सहज जमा होतात. बिल्डर्ससाठी 2 कोटी काही मोठी रक्कम नाही.

एक नक्की की, अनिल देशमुख आपल्या कामी आला असता.

मी साहेबांचा माणूस. पण, माझा फोटो ठेवत नाही. संबंध दाखवित नाही, कधी स्टेटस ठेवत नाही.

व्हीडिओ 35-के

वकिल महोदय अनिल गोटेंना सांगतात.

जोरदार आरोप करा आणि सांगा की यातील एकही आरोप खोटा निघाला तर सर्व प्रॉपर्टी दान करून टाकीन. असे करण्यापूर्वी सर्व संपत्ती आपल्या मुलाच्या नावे करून टाका.

वकिल : तुम्ही आरोप करायचे आणि मग आपल्या लोकांना सभागृहात बोंबाबोंब करायला लावायची

A story: Mahavikas Aghadi’s Mahakattalakhana .. Laav Re to video … Sharad Pawar has to finish Girish Mahajan and Devendra Fadnavis … 1 lakh 1 percent ….

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात