वृत्तसंस्था
मिदनापूर: केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे नेते अमित शहा यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसचे 11 आमदार, 1 खासदार आणि 1 माजी खासदार यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. 11 MLAs 1 MP joins bjp
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी मिदानापूर येथे सभा घेतली. त्यावेळी तब्बल 11 आमदार आणि खासदाराने, एका माजी खासदाराने भाजपत प्रवेश केल्यामुळे तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. 11 MLAs 1 MP joins bjp
सुवेंदू अधिकारी, तापसी मोंडल, अशोके दिंडा, सुदीप मुखर्जी, सैकत पांजा, शिलभद्र दत्ता, दिपाली बिस्वास, सुक्रा मुंडा, श्यामापदा मुखर्जी, विश्वजित कुंडू आणि बनश्री माती, अशी भाजपत प्रवेश केलेल्यांची नावे आहेत.
11 MLAs 1 MP joins bjp
शहा यांच्या दौऱ्यापूर्वी राजकीय घडामोडीस प्रारंभ झाला होता. मिदानापूरचे मातब्बर नेते , आमदार सुवेंदू अधिकारी यांच्या राजीनाम्याने ममता बॅनर्जी यांना आणि पक्षाला हादरा बसला होता. त्या धक्क्यातून सावरत असताना आज मातब्बर नेत्यानी भाजपत प्रवेश करून दुसरा धक्का दिला.
अमित शहा म्हणाले….
- तुम्ही कॉंग्रेसला तीन दशके, कम्युनिस्टांना 27 वर्षे आणि ममता दीदींना 10 वर्षे दिली. भारतीय जनता पक्षाला 5 वर्षे द्या, आम्ही बंगालला ‘सोनार बंगाल’ बनवू.
- पक्षाचे वरिष्ठ सदस्य टीएमसी सोडत आहेत. पक्षाच्या सदस्यांना दोष देण्यास उद्युक्त केल्याचा आरोप दीदी यांनी भाजपवर केला. पण मला विचारायचे आहे की जेव्हा तिने कॉंग्रेसला टीएमसी बनविण्यास सोडले, तेव्हा ते अपंग नव्हते का? ही फक्त सुरुवात आहे. निवडणुकीनंतर ती एकटी राहिल.
- निवडणुकीचा निकाल जाहीर होईल तेव्हा २०० पेक्षा जास्त जागा मिळून भाजप सरकार स्थापन करेल
– केंद्रीय गृहमंत्री अमित शहा