विशेष प्रतिनिधी
मालेगाव : सरकारने केलेली सोशल डिस्टसिंगची सूचना पाळणार नाही; पण सरकारने जनधन खात्यात भरलेले पैसे काढण्यासाठी मात्र गर्दी करू, हा “खाक्या” मालेगावातील नागरिकांनी दाखवला आहे. सरकारी योजनांचा लाभ घेणार मात्र कगद नाही दाखवणारचा “शाहीनबागी” नाटकाचा दुसरा अंक कोरोना लॉकडाऊनमध्ये असा सादर होतोय…!!
करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशात संचारबंदी लागू असून प्रशासनाकडून नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र मालेगाव शहरात सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
केंद्र शासनाने जनधन खाते धारकांच्या खात्यात ५०० रुपये मदत निधी जमा केली असून सदर रक्कम काढण्यासाठी खातेदारांनी सर्वच बँक मध्ये एकच गर्दी केली आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवत असल्याचे चित्र सध्या शहरात बघावयास मिळत आहे. मालेगाव शहरात सद्य स्थितीत एकही करोना सदृश्य रुग्ण नसला तरी यामुळे शहरात रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App