विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समिती आणि केशव सृष्टी माय ग्रीन सोसायटीच्यावतीने शहरात रोज १ लाख २० हजार फुड पँकेटचे वाटप करण्यात येत आहे. चीनी व्हायरसचा प्रादूर्भाव झाल्यानंतर ताबडतोब संघाने अन्नपूर्णा योजना सुरू केली. महापालिका क्षेत्रातील २४ प्रभागांमध्ये १७ कम्युनिटी किचन सुरू करण्यात आली आहेत. सात हजार स्वयंसेवक यात सहभागी झाले आहेत. मुंबई महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या डॉक्टर, नर्स, पोलिस, सफाई कर्मचारी, अन्य सेवांमधील कर्मचारी यांची दोन वेळच्या जेवणाची सोय करण्यात आली.
मुंबई महापालिका रोज ४० हजार फुड पँकेट आपल्या यंत्रणेतून नेते. अन्य ६० हजार फुड पँकेट वाटप स्वयंसेवक विविध भागांमधील गरजूंना करतात. यासाठी काही एनजीओ व अन्य संस्थाही मदत करतात. २० हजार फुड पँकेट रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना वाटप करण्यात येतात. केशव सृष्टीचे प्रतिनिधी विशाल टिबरेवाल यांनी ही माहिती दिली. लॉकडाऊन सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी तीन कम्युनिटी किचन तयार करून रोजंदारी कामगार आणि झोपडपट्टीवासीयांची अन्नाची सोय करण्यात आली. टप्प्याने अाणखी किचन सुरू करण्यात आली, अशी माहितीही त्यांनी दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App