• Download App
    शहरात राहणार्‍यानी गावाकडे पळू नये-बाळासाहेब थोरातांचे आवाहन | The Focus India

    शहरात राहणार्‍यानी गावाकडे पळू नये-बाळासाहेब थोरातांचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी 
    मुंबई : शहरातील काही नागरिक गावाकडे निघालेत. ही धावपळ, पळापळ कशासाठी? तुम्ही जेथे आहात तिथेच सुरक्षित राहा, असे आवाहन महाराष्ट्राचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
    तुम्हाला जीवनावश्यक सुविधा पुरवायला शासन कटिबद्ध आहे. यातून नवे वाद होतील, प्रशासनावर ताण निर्माण होईल. माझी विनंती आहे आपण धावपळ करून गावाकडे जाण्याचा प्रयत्न टाळावा, असे थोरात यांनी सांगितले.
    ते म्हणाले की, शहरातील नागरिक गावाकडे आल्याने काही ठिकाणी वादाची परिस्थिती निर्माण होतेय. गावकरी बांधवांना माझी विनंती आहे आपण काळजी घ्या मात्र कायदा हातात घेऊ नका, पोलिसांचे काम पोलिसांना करू द्या!

    Related posts

    निवडणूक रंगात आल्याबरोबर मोदींना शिव्या; मल्लिकार्जुन खर्गेंनी पुढे चालविली काँग्रेसी पराभवाची परंपरा!!

    ममता बॅनर्जींनी कितीही जोर लावू द्या, आम्ही बंगालमध्ये बाबरी मशीद बांधू देणार नाही; अमित शाहांचा इशारा

    सुप्रिया सुळेंच्या भाषणात भावनांचा महापूर; पण मुख्यमंत्री येण्यापूर्वीच बारामतीतल्या स्टेजवरून गेल्या निघून!!