• Download App
    मोदींचे आज रात्री ८.०० वाजता भाषण | The Focus India

    मोदींचे आज रात्री ८.०० वाजता भाषण

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक उपाययोजना आणि जागृतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८.०० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, पंतप्रधान कार्यालयाच्या सर्व सोशल मीडिया हँडलवरून त्यांचे भाषण लाइव्ह प्रसारित करण्यात येणार आहे. कोरोनाचा जगभरात वेगाने फैलाव होतो आहे. इटलीमध्ये एका दिवसात ४५० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. भारतात सरकार, आरोग्य संस्था, सार्वजनिक संस्था, नागरिक उत्तम समन्वय राखत कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करत आहेत. याची जगभरातून प्रशंसा होत आहे.

    Related posts

    मोदी सरकारची पेट्रोलियम कंपन्यांना तब्बल १.२३ लाख कोटी रुपयांची मदत; पेट्रोल – डिझेलच्या भडक्याला अटकाव; बाकीच्या आर्थिक उपायांनी अर्थव्यवस्था सुदृढ!!

    शिवसेनेची दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक; पण पवार कुटुंबीयांची राष्ट्रवादीवर वर्चस्व टिकवण्याची अयशस्वी धडपड!!

    काँग्रेसची तामिळनाडूत जोसेफ विजयच्या TVK पक्षाच्या सत्तेत शिरकत; पण INDI आघाडीच्या बैठकीत काँग्रेसने काढली त्या पक्षाची इज्जत!!