• Download App
    भारतीय विद्यार्थ्यांनी अमेरिकेत शिकायला यावे; स्वागतच आहे ; महामारीतून लवकर मार्ग निघण्याचा आशावाद | The Focus India

    भारतीय विद्यार्थ्यांनी अमेरिकेत शिकायला यावे; स्वागतच आहे ; महामारीतून लवकर मार्ग निघण्याचा आशावाद

    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन : भारतीय विद्यार्थ्यांनी अमेरिकेत शिक्षणासाठी जरूर यावे. त्यांचे स्वागतच आहे, असे प्रतिपादन ट्रम्प प्रशासनातील अधिकारी एलिस वेल्स यांनी केले. भारतीय विद्यार्थी आणि दूतावासातील अधिकाऱ्यांशी त्या व्हर्च्युअल संवाद साधत होत्या. अमेरिकेचे भारतातील माजी राजदूत रिचर्ड वर्मा यात सहभागी झाले होते.

    महामारीच्या काळात परदेशांत असलेल्या भारतीयांचा ओढा मायदेशाकडे असताना अमेरिकन प्रशासनातील महत्त्वाची जबाबदारी संभाळणाऱ्या अधिकाऱ्याने व्यक्क केलेली सकारात्मकता महत्त्वाची मानली जात आहे. एलिस वेल्स परराष्ट्र खात्याच्या उपमंत्री होत्या. दक्षिण आशिया विभागाची सूत्रे त्यांनी संभाळली आहेत.

    कोविड १९ महामारी लवकर संपेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. कोणतेही विद्यार्थी आपल्या देशाचे सकारात्मक प्रतिनिधित्व करतात. त्यांच्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध दृढ होतात, असे सांगून त्या म्हणाल्या, “सध्या महामारीचा प्रकोप असल्याने व्हिसावर बंधने आहेत. पण ही बंधने कायम राहणारी नाहीत. लवकरच स्थिती सामान्य झाली की भारतीय विद्यार्थ्यांनाही व्हिसा जारी करण्यात येतील. भारतीय विद्यार्थ्यांनी अमेरिकेत शिक्षणासाठी जरूर यावे. त्यांचे स्वागतच आहे.”

    सुमारे २ लाख भारतीय विद्यार्थी अमेरिकेत विविध विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत आहेत. चीन खालोखाल ही संख्या आहे. महामारीच्या काळात या विद्यार्थी वर्गाची ट्रम्प प्रशासन मदत करत आहे, अशी ग्वाही देखील एलिस वेल्स यांनी दिली.

    Related posts

    मोदी सरकारची पेट्रोलियम कंपन्यांना तब्बल १.२३ लाख कोटी रुपयांची मदत; पेट्रोल – डिझेलच्या भडक्याला अटकाव; बाकीच्या आर्थिक उपायांनी अर्थव्यवस्था सुदृढ!!

    शिवसेनेची दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक; पण पवार कुटुंबीयांची राष्ट्रवादीवर वर्चस्व टिकवण्याची अयशस्वी धडपड!!

    काँग्रेसची तामिळनाडूत जोसेफ विजयच्या TVK पक्षाच्या सत्तेत शिरकत; पण INDI आघाडीच्या बैठकीत काँग्रेसने काढली त्या पक्षाची इज्जत!!