पाकिस्तानातील मौलानांचे डोके फिरले; …म्हणाले महिलांच्या चुकीच्या कामामुळे पसरला चिनी विषाणू

वृत्तसंस्था

इस्लामाबाद : चीनी व्हायरसचे गंभीर संकट अद्यापही पाकिस्तानच्या लक्षात आलेले नाही. मशिदींमध्ये व्हायरसचा प्रादुर्भाव होत नाही, असे एका मौलानाने म्हटले होते. आता पाकिस्तानातील नावाजलेल्या मौलानाने आणखी अकेलेचे तारे तोडले आहे. महिलांनी केलेल्या चुकीच्या कामांमुळेच जगात कोरोना व्हायरस पसरला आहे. विशेष म्हणजे मौलाना ही मुक्ताफळे उधळत असताना लाइव्ह टीव्ही प्रोग्रामदरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही उपस्थित होते.

निधी संकलसाठी आयाेिजत करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मौलाना तारीकजमील बोलत होते. हा मौलाना महिलांवर ही आक्षेपार्ह टीका करत असताना इम्रान खान यांनी मौलानाला थांबवले नाही आणि अशी टीका केल्याबद्दल जाबही विचारला नाही.

इतकच नाही तर, मौलाना जमीलने खोट पसरवण्यासाठी मीडियावरही टीका केली, परंतू नंतर याबाबत माफीदेखील मागितली. पण, महिलांवर केलेल्या विधानाबाबत त्यांनी अद्यापही माफी मागितली नाही. त्यांच्या या विधानावर पाकिस्तानातील मानवाधिकार आयोगाने आक्षेप नोंदवला आहे.

मानवाधिकार आयोगाने मौलानच्या विधानावर ट्वीट करत लिहीले की, ”कमीशन याबाबत दुख: व्यक्त करत आहे की, मौलानाने महिलांच्या सन्मानाची तुलना कोव्हिड 19 सोबत केली आहे. अशी विधानांना स्विकार केले जाणार नाही, आणि टीव्हीवर अशाप्रकारची विधाने केल्यामुळे चुकीचा संदेश जातो.”.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात