विशेष प्रतिनिधी
मुंबई : शरद पवार यूपीए चेअरमन होणार या दिवसभर मराठी चॅनेलवर चाललेल्या बातमीवर दस्तुरखुद्द पवारांनीच पडदा पाडला आहे. पण नेमके काय झाले असावे? की त्यांना दिवसभर चाललेल्या बातमीवर पडदा पाडावासा वाटला… sharad pawar latest news
- शरद पवार यूपीए चेअरमन होणार ही बातमी दिवसभर फिरली तेव्हा ते सोनिया गांधींना रिप्लेस करणार अशा बातम्या आल्या. काँग्रेस नेत्यांना त्या बातम्या कितपत सहन झाल्या असतील??
- पवारांनी नुकतीच राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सातत्य नाही, अशी टीका केली होती. त्यावर महाराष्ट्रातूनन यशोमती ठाकूर आणि बाळासाहेब थोरात यांनी पवारांना समजेल या भाषेत इशारे दिले होते.
- आजही पवारांच्या नावाची यूपीए चेअरमनपदासाठी चर्चा सुरू होताच काँग्रेसनेही ती खेळी उलटविण्यासाठी पवारांचेच जुने बंडखोर सहकारी तारिक अन्वर यांना पवारांचे नाव खोडून काढण्यासाठी निवडले. त्यांनी पत्रकारांना पवार चेअरमन होतील, अशी कोणतीही चर्चा नसल्याचे स्पष्ट सांगून त्या बातमीतली हवा पूर्ण काढून टाकली.
- काँग्रेसने एकदा स्पष्ट खुलासा केल्यानंतर पवारांच्या चेअरमन होण्याचा बातमीतली हवा पूर्ण निघून गेली. त्यामुळे बातमी पुढे चालवण्यात आणि चर्चा घडविण्यात फारसा राजकीय लाभ उरला नाही. झाला तर तोटाच होईल असे पवारांच्या लक्षात आले असावे.
sharad pawar latest news
- त्यातून एबीपी माझाकडे स्वतः शरद पवारांनी चेअरमन बनण्याच्या बातमीत तथ्य नसल्याचा खुलासा करून बातमी आणि चर्चेवर पडदा पाडला असावा.