वृत्तसंस्था
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडात मोठा शस्त्रसाठा जप्त केला. त्यात १० पिस्तूल आणि ५ ग्रेनेडसह दारूगोळा हाती लागला आहे. सुरक्षा दलांनी मंगळवारी कुपवाडा (जम्मू आणि काश्मीर) येथे शोध मोहिम राबविली. तेव्हा १० पिस्तूल, १७ पिस्तुल मॅगझिन आणि ५४ राऊंड आणि ५ ग्रेनेड जप्त केले. Weapons seized in Kupwara, Jammu and Kashmir; Ammunition with 10 pistols and 5 grenades in hand
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे रविवारी हंदवाडा येथे एका दहशतवाद्याच्या साथीदाराला अटक केल्यानंतर एक चिनी पिस्तूल, दोन पिस्तुल मॅगझिन आणि १३ गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App