विशेष प्रतिनिधी
नवा दिल्ली : संसदेतील जोरदार भाषणानंतर अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहेत. एका टीव्ही कलाकाराने तर आक्षेपार्ह शब्दांत त्यांच्यावर टीका केली आहे. अमिताभ बच्चन यांची प्रतिष्ठा नटगुल्ली पत्नीने धुळीला मिळवल्याचे त्याने म्हटले आहे.TV star’s offensive remarks about Jaya Bachchan, Amitabh’s reputation tarnished by Natgulli wife
जया बच्चन यांनी नुकतेच राज्यसभेत भाषण केले. यावेळी प्रचंड संतापात त्यांनी भाजपला शापही दिला. त्यांच्या या भाषणावर प्रसिद्ध टीव्ही कलाकार फिरोज खान यांनी टिप्पणी केली आहे.अर्जुनची भूमिका साकारणारे अभिनेता फिरोज खान यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की,
अमिताभ बच्चन यांनी गेल्या 50 वर्षांत जी प्रतिष्ठा कमावली होती, त्यांच्या नटगुल्ली पत्नीने त्या प्रतिष्ठेचा कचरा केला, असे म्हटले आहे. फिरोज खान यांचे हे ट्विट सोशल मीडियावर वेगने व्हायरल होत आहे. त्यांच्या या ट्विटवर त्यांच्या समर्थनार्थ आणि विरोधातही लोक प्रतिक्रिया देत आहेत.
ऐश्वर्या राय बच्चन अंमलबजावणी संचालनालयात हजर झाल्यानंतर जया बच्चन यांदी भाजपावर ही टीका केली आहे. मला कोणावरही वैयक्तिक टीका करायची नाही. मी तुम्हा लोकांना शाप देते की तुमचे वाईट दिवस लवकरच येणार आहेत, असे म्हणत त्यांनी भाजपवर हल्ला चढवला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App