विशेष प्रतिनिधी
कोलकाता: उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांसारखी निवडून न येता आल्यामुळे झाली तशी अवस्था आपली होऊ नये अशी धास्ती आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना वाटू लागली आहे. त्यामुळे त्यांनी आता निवडणूक आयोगावर टीका सुरू केली आहे. पोटनिवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोग तिसऱ्या लाटेची वाट पाहत आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.Trinamool Congress criticizes Election Commission, Mamata Banerjee has threat to step down
पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या ७ जागांच्या निवडणुका आणि पोटनिवडणुका जाहीर करण्यात दिरंगाई होत असल्यावरून तृणमूल काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. तृणमूल काँग्रेसचे एक शिष्टमंडळ गुरुवारी निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे.
मुख्यमंत्रीपदावर कायम राहण्यासाठी ममता बॅनर्जी यांना पोटनिवडणूक लढणं गरजेचं आहे. यावरून तृणमूल काँग्रेसचे नेते सुखेंदू शेखर रे यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. ते म्हणाले, निवडणूक आयोग निवडणूक घेण्यासाठी करोनाच्या तिसऱ्या लाटेची वाट बघतयं का? देशातील करोनाचा संसर्ग बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. परिस्थिती निवडणुका घेण्यासाठी अनुकूल आहे.
राज्यातील ५ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. उमेदवारांच्या निधनामुळे दोन जागांवरील मतदान रद्द करण्यात आले आहे. अशा एकूण ७ जागांवर पोटनिवडणूक होणे अपेक्षित आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राम मतदारसंघात पराभव झाला. भाजप उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचा पराभव केला होता.
करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निवडणुका अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि अर्थमंत्री अमित मित्रा हे दोघे विधानसभेचे सदस्य म्हणजेच आमदार नाहीत. मित्रा यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण ममता बॅनर्जींना मात्र विधानसभेत जाण्यासाठी पोटनिवडणूक जिंकणे गरजेचे आहे. मंत्रीपदावर गेल्यानंतर त्या नेत्याला विधानसभा किंवा विधान परिषदेवर सहा महिन्याच्या आत आमदार होणे गरजेचे असते.
Trinamool Congress criticizes Election Commission, Mamata Banerjee has threat to step down
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचे गिफ्ट, DA 11% वाढून 28% केला, जाणून घ्या सॅलरी आणि पेन्शनमध्ये किती होणार वाढ
- फादर स्टॅन स्वामींना पद्म पुरस्कार देण्यात यावा, काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांचे ट्वीट
- Patanjali Research Trust : बाबा रामदेवांच्या पतंजली रिसर्च फाउंडेशनला दान दिल्यास टॅक्समध्ये मिळेल पाच वर्षांसाठी सूट
- गोव्यातही 300 युनिट मोफत वीज देणार केजरीवाल, सत्ता आल्यास जुने वीजबिल माफ करण्याचे आश्वासन