उत्तर प्रदेश सरकारने रवींद्र गौतम यांना निलंबित करत चौकशी सुरू केली होती
प्रतिनिधी
लखनऊ : दहशतवादी ओसामा बिन लादेनचा फोटो कार्यालयात लावून त्याला उत्कृष्ट अभियंता संबोधल्याच्या आरोपाखाली उत्तर प्रदेशच्या विद्युत विभागात नियुक्त केलेल्या एका उपविभागीय अधिकाऱ्याला (एसडीओ) सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. The SDO of the Electricity Department who placed Osama bin Laden photo in the office was fired from his job
उत्तर प्रदेश सरकारने कारवाई केली असून, दक्षिणांचल विद्युत वितरण निगमचे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी अमित किशोर यांनी सांगितले की, त्यांच्या शिफारशीवरून उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (UPPCL) चे अध्यक्ष एम देवराज यांनी विभागीय SDO रवींद्र प्रकाश गौतम यांची सेवा समाप्त केली आहे.
दिल्लीत पंतप्रधान मोदींविरोधात ‘पोस्टर वॉर’, पोलिसांनी 100 जणांविरोधात दाखल केली FIR; 6 जणांना अटक
जून २०२२ मध्ये उत्तर प्रदेशच्या विद्युत विभागातील एसडीओ रवींद्र गौतम यांनी दहशतवादी ओसामा बिन लादेनला जगातील सर्वोत्तम अभियंता म्हणत त्याचा फोटो आपल्या कार्यालयात लावला होता. त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने रवींद्र गौतम यांना निलंबित करत चौकशी सुरू होती.
यासंदर्भात बोलताना यूपीपीसीएलचे अध्यक्ष एम देवराज म्हणाले, ओसामा बिन लादेन हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी होता. त्याचा उल्लेख सर्वोत्तम अभियंता असा करत गौतम यांनी त्याचा फोटो आपल्या कार्यालयात लावला. त्यांच्या या कृतीमुळे विद्युत विभागाची प्रतिमा मलिन झाली आहे. गौतम यांनी लादेन ऐवजी महापुरुषांचे फोटो कार्यालयात लावायला हवे होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App