विशेष प्रतिनिधी
मुंबई – महाराष्ट्रातील बहुचर्चित पहाटेचा शपथविधी झाला त्यावेळी सगळ्यांनी मुंबईतील दरबार हॉल पाहिला होता. हा दरबार हॉल इंग्लंडचे महाराजे पंचम जॉर्ज व राणी मेरी यांच्यासाठी 1911 मध्ये बांधला होता. त्याचे नूतनीकरण करण्यात आले असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन झाले.The Darbar hall was built for the For King George V and Queen Mary of England
राजभवनातील नवीन दरबार हॉल हा जुन्या दरबार हॉलच्या जागेवरच बांधण्यात आला असून 225 इतकी आसन क्षमता असलेल्या हॉलची आसन क्षमता आता 750 इतकी झाली आहे.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राजभवनातील दरबार हॉलचा वापर हा शपथविधी सोहळे, शासकीय कार्यक्रम, पोलीस अलंकरण समारोह, शिष्टमंडळाच्या भेटी तसेच लहान मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे स्थळ यासाठी केला जाऊ लागला.
शंभर वर्षांहून अधिक काळ समुद्राच्या लाटा आणि वादळ-वाऱ्यांचे तडाखे सहन केल्यामुळे पूर्वीचा दरबार हॉल अतिशय जीर्ण झाला होता. त्यामुळे 2016 नंतर त्याचा वापर थांबविण्यात व कालांतराने त्याजागी नवा अधिक क्षमतेचा दरबार हॉल बांधण्याचा निर्णय झाला.
नव्या दरबार हॉलचे बांधकाम 2019 साली सुरु झाले. मात्र कोविडच्या उद्रेकामुळे बांधकामाची गती मंदावली कालांतराने बांधकाम पुनश्च सुरु झाले व डिसेंबर 2021 मध्ये हॉल बांधून पूर्ण झाला.
इंग्लंडचे महाराजे पंचम जॉर्ज व राणी मेरी यांच्या 1911 साली झालेल्या भारत भेटीच्या वेळी दरबार हॉल बांधण्यात आला होता. त्याची वास्तू रचना तत्कालीन वास्तुरचनाकार जॉर्ज विटेट यांची होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App