प्रतिनिधी
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून कोशियारी यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात सध्या कोशियारी यांच्या पदमुक्तीबाबत चर्चा सुरू आहे. Sudhir mungantiwar targets rahul Gandhi over savarkar insult issue
सातत्याने केलेल्या वादग्रस्त विधानामुळे आणि वादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे राज्यपालांनी हे पाऊल उचलल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. यालाच प्रत्युत्तर कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार दिले आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी अतिशय नीच आणि निम्न शब्दात बोलणाऱ्या राहुल गांधींनीही राजीनामा दिला पाहिजे, असा टोला मुनगंटीवार यांनी हाणला आहे.
राज्यपालांच्या पदमुक्तीच्या पत्रकाबाबत एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, राज्यपालांनी चिंतन, अध्ययन करण्यासाठी वेळ खर्च करण्याची अपेक्षा व्यक्त केली. आपल्या देशातील आपण असे बरेच राजकीय नेते बघितले आहेत, ज्यांचे वय कितीही झाले तरी खुर्ची सोडायला तयार नाहीत. राजकारण सोडायला तयार नाहीत. पद सोडायला तयार नाहीत. हातात काठी घेतली तरीही. राज्यपालांनी हा जो काही भाव व्यक्त केलाय, तो सर्व राजकीय पक्षातील नेत्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.
सतत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे आणि वादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे राज्यपालांनी हे पाऊल उचलले आहे, अशी विरोधकांनी केली आहे. याबाबत मुनगंटीवार म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी अतिशय नीच आणि निम्न शब्दात बोलणाऱ्या राहुल गांधींनीही राजीनामा दिला पाहिजे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App