प्रतिनिधी
मुंबई – निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, वायनाडचे खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याशी जी चर्चा झाली, तेव्हा शरद पवारांच्या राष्ट्रपतीपदाचा विषयच चर्चेला आला नसल्याचा खुलासा ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी करून या चर्चेतली हवाच काढून टाकली. Sharad pawar`s presidential candidature subject not even touched upon during prashant kishore`s discussion with Gandhi Family
जोपर्यंत अनुकूल नंबर्स नसतील, म्हणजे मतांचे गणित जमत नसेल राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत शरद पवार उतरणार नाहीत. ज्या निवडणूकीत पराभवच होणार आहे, याची खात्री असेल, तर पवार त्या निवडणूकीत उतरणार नाहीत, असे राजदीप सरदेसाई यांनी सांगितले. मुंबई तक या बेवपोर्टलने ही बातमी दिली आहे.
शरद पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत फक्त दोनच पराभव पचवले. एकदा BCCI च्या निवडणूकीत पवार जगमोहन दालमियांकडून पराभूत झाले होते आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक ते सीताराम केसरींच्या विरोधात मोठ्या फरकाने हरले होते, याची आठवण राजदीप सरदेसाई यांनी करून दिली. त्यामुळे २०२२ च्या निवडणूकीत शरद पवारांसारखा अनुभवी नेता नंबर्स अनुकूल नसताना राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत उतरेल, असे वाटत नाही, अशी स्पष्टोक्ती राजदीप यांनी केली.
राष्ट्रपतीपदाची निवडणूक २०२२ च्या जून – जुलैत आहे. त्याआधी उत्तर प्रदेश, पंजाबसह ५ राज्यांच्या विधानसभा निवडणूका आहेत. तिथले नंबर्स कसे येतात याकडे सगळ्यांचे लक्ष असेल. त्या राज्यांच्या निवडणूका होत नाहीत तोपर्यंत राष्ट्रपतीपदाच्या बातम्या काल्पनिक असतील, असे ते म्हणाले.
मूळात सोनिया गांधी – राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेत शरद पवारांच्या राष्ट्रपतीपदाचा विषय आलाच नाही. जी चर्चा झाली, ती फक्त काँग्रेसच्या देशपातळीवरील संघटनात्मक बांधणीवर झाली. पंजाब किंवा उत्तर प्रदेश या राज्यांच्या निवडणूकांचा वेगळा विषय देखील चर्चेत नव्हता. असलाच, तर तो काँग्रेसच्या संघटना बांधणीच्या दृष्टीने आला असेल, असे ते म्हणाले.
प्रशांत किशोर सध्या job opportunity च्या शोधात आहेत. कारण त्यांचे पश्चिम बंगालमधले काम संपले आहे. पंजाबमध्ये ते मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे राजकीय सल्लागार आहेत. प्रशांत किशोर यांची राजकीय महत्त्वाकांक्षा मोठी असल्याने ते मोठ्या job च्या शोधात असावेत. राहुल गांधींनी ठरवले तर प्रशांत किशोर यांना ते राजकीय सल्लागार नेमू शकतात किंवा यूपीएचे समन्वयक म्हणून देखील त्यांना पद मिळू शकते. कारण त्यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी उत्तम संबंध आहेत, असे राजदीप सरदेसाई यांनी स्पष्ट केले.
Sharad pawar`s presidential candidature subject not even touched upon during prashant kishore`s discussion with Gandhi Family
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवारांना राष्ट्रपती बनविण्यासाठी प्रशांत किशोरांकडून विरोधकांची जमवाजमव, राहुल गांधींशी बैठकीनंतर चर्चांनी धरला जोर
- फादर स्टेन स्वामींना नोबेल मिळावा, त्यांच्या राज्य प्रायोजित मृत्यूची सुप्रीम कोर्टाने दखल घ्यावी – ज्युलियो रिबेरो
- No miniti bank or pigy bank its Modi bank; लहान मुलांना बचती सवय लावण्यासाठी बिहारमध्ये कारागिराने घडविली मोदी बँक
- ओढून ताणून आणा, पटोले नाना…!!; पवारांनी छोटा माणूस म्हटलेल्या नानांना सामनातूनही कानपिचक्या
- शैक्षणिक शुल्कनिश्चितीचा प्रस्ताव खुंटीला टांगला; भाजपाचे शिवराय कुळकर्णी यांचा सरकारवर आरोप