प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी आपल्या अयोध्येविषयी लिहिलेल्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना आयएसआयएस आणि बोको हराम यांच्यासारख्या जिहादी हिंसक दहशतवादी संघटनांशी केली आहे. या मुद्द्यावरून त्यांना काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलामनबी आझाद यांनी कानपिचक्या दिल्या आहेत.Salman Khursheed, close to the Gandhis, writes that Hindutva is similar to the jihadist Islamist groups like ISIS and Boko Haram
Salman Khursheed, close to the Gandhis, writes that Hindutva is similar to the jihadist Islamist groups like ISIS and Boko Haram. Ghulam Nabi Azad, member of G-23, calls it factually wrong and exaggeration. It would therefore be fair to assume that Khursheed is echoing Gandhis. pic.twitter.com/pPzpq9XYfu — Amit Malviya (मोदी का परिवार) (@amitmalviya) November 11, 2021
Salman Khursheed, close to the Gandhis, writes that Hindutva is similar to the jihadist Islamist groups like ISIS and Boko Haram.
Ghulam Nabi Azad, member of G-23, calls it factually wrong and exaggeration.
It would therefore be fair to assume that Khursheed is echoing Gandhis. pic.twitter.com/pPzpq9XYfu
— Amit Malviya (मोदी का परिवार) (@amitmalviya) November 11, 2021
या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यातली विसंगती भाजप नेत्यांनी टिपली आहे. हिंदुत्वाच्या राजकीय अजेंड्याविषयी मतभेद असू शकतात. परंतु हिंदुत्वाची तुलना इस्लामी जिहादी गटांशी करणे योग्य नाही. वस्तुस्थितीला धरून नाही आणि ती अतिशयोक्ती पण आहे, अशा स्पष्ट शब्दांत गुलाम नबी आझाद यांनी सलमान खुर्शीद यांना कानपिचक्या दिल्या आहेत.
या मुद्द्यावर भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख निमंत्रक अमित मालवीय यांनी नेमकेपणाने बोट ठेवले आहे. सलमान खुर्शीद हे गांधी कुटुंबीयांच्या जवळचे नेते आहेत. गुलाम नबी आझाद हे जी 23 गटाचे नेते आहेत. सलमान खुर्शीद हे हिंदुत्वावर बोलताना गांधी परिवाराचीच भाषा बोलत आहेत, अशा शब्दांत अमित मालविया यांनी टीकास्त्र सोडले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App