पंजाबमधील सुवर्ण मंदिरात झालेल्या विटंबनेच्या प्रकारानंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, कपूरथळा येथूनही असेच एक प्रकरण समोर आले आहे. असे सांगण्यात येत आहे की, निशाण साहिबचा अवमान करणाऱ्या आरोपीला जमावाने बेदम मारहाण केली, यातच त्याचा मृत्यू झाला. Sacrilege from Nishan Sahib in Kapurthala, accused dies after mob thrashing, second case after Amritsar
वृत्तसंस्था
चंदिगड : पंजाबमधील सुवर्ण मंदिरात झालेल्या विटंबनेच्या प्रकारानंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, कपूरथळा येथूनही असेच एक प्रकरण समोर आले आहे. असे सांगण्यात येत आहे की, निशाण साहिबचा अवमान करणाऱ्या आरोपीला जमावाने बेदम मारहाण केली, यातच त्याचा मृत्यू झाला.
अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात शनिवारी घडलेल्या घटनेनंतर रविवारी कपूरथळाच्या निजामपूरमध्ये कथित विटंबनेचे प्रकरण उघडकीस आले. मारहाणीनंतर आरोपीचा मृत्यू झाला आहे.
कपूरथला येथे रविवारी सकाळी आरोपीने निशाण साहिब काढण्याचा प्रयत्न केला. आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळू लागला. संगतने त्याला पकडले. मिळालेल्या माहितीनुसार, लोकांनी त्याला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर कपूरथळामध्ये तणावाचे वातावरण आहे.
कपूरथळा गुरुद्वाराने केलेल्या घोषणेमध्ये पोलीस आणि कोणत्याही एजन्सीने यामध्ये हस्तक्षेप करू नये, असे म्हटले आहे. पंजाब पोलीस आणि राज्य सरकार हे विटंबनेच्या प्रकरणांना तितकेच जबाबदार आहेत. यासोबतच लोकांना मोठ्या संख्येने जमा होण्यास सांगण्यात आले आहे.
बाबा अमरजित सिंह यांनी सांगितले की, पहाटे ४ वाजता एक व्यक्ती दरबार हॉलमध्ये आला. प्रवेशाच्या वेळी गुरुसाहेबांमध्ये गुरु महाराजांचा प्रकाश नव्हता. आवाज दिल्यावर त्या व्यक्तीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण संगतने त्याला पकडले. मात्र, हे प्रकरण सिलिंडर चोरीचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुरुद्वारा साहिबजवळ पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्यास विरोध होत होता. घटनेची माहिती मिळताच शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती घटनास्थळी दाखल झाली. मोठ्या संख्येने शीख संघटना घटनास्थळी पोहोचू लागल्या. एसएसपी कपूरथला यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आदल्या दिवशी पंजाबमधील अमृतसर सुवर्ण मंदिरात पवित्र गुरु ग्रंथ साहिबची तोडफोड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीची कथित लिंचिंग झाली होती. डीसीपी परमिंदर सिंग यांनी या व्यक्तीच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. या घटनेनंतर सुवर्ण मंदिरातील वातावरण चांगलेच तापले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेहरास साहिब पठणादरम्यान एका अज्ञात व्यक्तीने सुवर्ण मंदिराच्या आतील रेलिंगवरून उडी मारली आणि कथितरीत्या ग्रंथसाहिबसमोर ठेवलेली तलवार हिसकावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, जमावाने तरुणाला पकडून बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
रविवारी कपूरथळा येथील घटनेनंतर अमृतसरमध्ये पोलिसांनी सतर्कता वाढवली आहे. तसेच सुवर्ण मंदिर परिसराभोवती सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. शनिवारी घडलेल्या घटनेतील आरोपींची ओळख पटवण्यासाठी बायोमेट्रिक फिंगरप्रिंट स्कॅनिंगवर पोलीस भर देत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App