प्रतिनिधी
नवी दिल्ली : मुघलांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या मुद्यावरुन देशात राजकीय वातावरण तापले असताना आता गोव्यात खऱ्या अर्थाने सांस्कृतिक पुनरुत्थान होत आहे. Rebuilding temples destroyed by the Portuguese; Chief Minister Dr. Announcement by Pramod Sawant
गोव्यात धर्मांध पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. पोर्तुगीजांनी गोव्यातील जी मंदिरे उद्ध्वस्त केली, ती मंदिरे पुन्हा बांधली जातील. यासाठी यापूर्वीच अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली, अशी घोषणा नवी दिल्लीत डॉ. सावंत यांनी केली आहे.
प्रमोद सावंत आज घेणार गोव्याच्या मुख्यमंतिपदाची शपथ, पंतप्रधान मोदींसह अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीही राहणार हजर
– पर्यटकांना मंदिरापर्यंत न्यावयाचे आहे
सावंत म्हणाले की, आमचे सरकार पर्यटकांच्या सर्वात आवडत्या गोव्यातील सांस्कृतिक पर्यटनाला चालना देण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत आहे. प्रत्येक गावात एक-दोन मंदिरे आहेत. सर्व पर्यटकांना समुद्र किनाऱ्यावरुन मंदिरांपर्यंत घेऊन जाण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आमचे सरकार सांस्कृतिक पर्यटनाला चालना देत आहे.
– समान नागरी कायदा हवाच
समान नागरी कायदा गोव्यात पूर्वीपासूनच लागू आहे. आता सर्वच राज्यांनी त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. या प्रकरणी आमची अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशीही चर्चा झाल्याचे ते म्हणाले.
सावंत यांनी गोव्याच्या स्वातंत्र्यात विलंब होण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारला जबाबदार धरले. ते म्हणाले, भारत 1947 साली स्वतंत्र झाला. त्यानतंर 1967 साली गोव्याला स्वातंत्र्य मिळाले. कारण त्या वेळच्या सरकारांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवून गोव्याला 1947 मध्ये किंवा त्यानंतर लगेच स्वतंत्र केले नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App