राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे होणार स्वयंसेवक इंटरनेटवर सक्रीय


विशेष प्रतिनिधी

चित्रकूट : राष्ट्रीय  स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आता इंटरनेटवर सक्रीय होणार आहेत. यासाठी संघानेही भाजपच्या आयटी सेल प्रमाणे  उच्च तंत्रज्ञान डिजिटल सूचना संवाद केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे.Rashtriya Swayamsevak Sangh volunteers will be active on the internet

राष्ट्रीय स्तरापासून ते गावांपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या विचारांचा प्रसार शाखांमार्फत किंवा सेवा कार्यांद्वारे करत आला आहे. संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे अधिकारी आणि सदस्यांमधील काही जण इंटरनेट मीडिय किंवा सोशल मीडियावर सक्रिय आहेत. संघाची विचारधारा मानणाऱ्या  ५० हून अधिक संघटना सक्रिय आहेत.



त्यांच्याशी संबंधित विविध वर्गांच्या नागरिकांपर्यंत ते राष्ट्रवादी विचार आणि विचारसरणी पोहोचवत आहेत.पहिल्यांदाच संघांचे स्वयंसेवक हे इंटरनेट मीडिया माध्यमातून संघाचे विचार हे खुल्या मंचावर मांडतील. तर्कांसह ते आपला मुद्दा समाजात ठेवतील. नागरिकांमधील गैरसमज दूर करतील.

यासाठी संघाकडून स्वयंसेवकांना प्रशिक्षणही दिले जाईल. यासोबतच हायटेक डिजिटल सूचना संवाद केंद्रही उभारेल. इंटरनेटवर मीडियावर पसरवल्या जात असलेल्या चुकीच्या गोष्टींना संवाद केंद्राद्वारे उत्तर देण्यासाठी आपल्या डिजिटल व्हॉलिंटियर्सना युक्तिवादासाठी तयार करतील, असं वृत्त जागरणने दिलं आहे.

चित्रकूटमध्ये अखिल भारतीय प्रांत प्रचारकांच्या ४ दिवसांच्या बैठकिच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी प्रवासी मंजुरांना रोजगार आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न आणि पुढे नेण्यावर चर्चा झाली. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या  लाटेपूर्वी बचाव आणि उपचारासंबंधी व्यवस्था करण्यावरही भर देण्यात आला.

Rashtriya Swayamsevak Sangh volunteers will be active on the internet

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात