• Download App
    राहूल गांधी चांगले विरोधी पक्षनेते, पंतप्रधान होऊ शकणार नाही, जावेद अख्तर यांचा घरच्या आहेरानंतर कॉँग्रेसची ट्रोलधाड पडली तुटून|Rahul Gandhi will not be a good Leader of the Opposition, he will not be the Prime Minister, after Javed Akhtar's tweet, the Congress troll broke down

    राहूल गांधी चांगले विरोधी पक्षनेते, पंतप्रधान होऊ शकणार नाही, जावेद अख्तर यांचा घरच्या आहेरानंतर कॉँग्रेसची ट्रोलधाड पडली तुटून

    अनेक निवडणुकांत राहूल गांधी यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा उघड झाल्या असल्या तरी कॉंग्रेसमधील हुजऱ्या संस्कृतीतील नेते त्यांनाच पंतप्रधानपदाचे उमेदवार मानत आहे. देशातील तथाकथित लिबरल्सचे महत्वाचे शिलेदार मानले जाणारे गीतकार जावेद अख्तर यांनीच त्यांना घरचा आहेर दिला आहे. राहूल गांधी चांगले विरोधी पक्षनेते होऊ शकतात, परंतु चांगले पंतप्रधान होऊ शकणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.Rahul Gandhi will not be a good Leader of the Opposition, he will not be the Prime Minister, after Javed Akhtar’s tweet, the Congress troll broke down


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : अनेक निवडणुकांत राहूल गांधी यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा उघड झाल्या असल्या तरी कॉंग्रेसमधील हुजºया संस्कृतीतील नेते त्यांनाच पंतप्रधानपदाचे उमेदवार मानत आहे.

    देशातील तथाकथित लिबरल्सचे महत्वाचे शिलेदार मानले जाणारे गीतकार जावेद अख्तर यांनीच त्यांना घरचा आहेर दिला आहे. राहूल गांधी चांगले विरोधी पक्षनेते होऊ शकतात, परंतु चांगले पंतप्रधान होऊ शकणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.



    काँग्रेसचे जेष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त एक ट्विट केलं होतं. ज्यामध्ये राजीव गांधी आणि राहुल गांधी यांचा फोटो होतो आणि त्यासोबत एकेकाळचा आणि भविष्यातील लोकशाहीतील राजा असे लिहीले होते.

    यामध्ये त्यांनी राहुल गांधी हे भविष्यातील पंतप्रधान असतील असे म्हटले खुर्शीद यांच्या या ट्विटवर अनेकांनी टीका देखील केली होती. गीतकार जावेद अख्तर यांनी देखील ट्विटमधून राहुल गांधींसोबत पंतप्रधान मोदींना देखील टोला लगावला आहे. जावेद अख्तर यांनी ट्विट करत राहुल गांधी चांगले विरोधी पक्षनेते होऊ शकतात पंतप्रधान नाही असे म्हटले आहे.

    जावेद अख्तर यांनी आपल्या ट्विटमधून सलमान खुर्शीद यांना उत्तर दिलं आहे. ह्ल तुमचा विरोधाभासातील लोकशाहीचा राजा हा अत्यंत दयनीय आहे. राहुल गांधी यांना एक श्रेष्ठ विरोधी पक्षनेता म्हणून स्विकारता येईल पण त्यांना जे कोणी पंतप्रधान बनवण्याचं स्वप्न पाहत आहेत

    ते नरेंद्र मोदींना कायमस्वरुपी पंतप्रधानपदी ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे जावेद अख्तर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.राहूल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार केल्यास नरेंद्र मोदी यांना हरविणे कधीही शक्य नाही, असेच त्यांनी या ट्विटमधून सुचविले आहे.

    त्यामुळे अख्तर यांच्यावरही कॉँग्रेसच्या आयटी सेलकडून टीका सुरू झाली आहे. अनेकांनी जावेद अख्तर यांच्यावर टीका केली आहे. तर काहींनी त्यांचे समर्थन केलं आहे. राहुल गांधी यांच्याकडे पंतप्रधान बनण्याची क्षमता आहे आपण डोळे बंद करुन त्यांच्याविरुद्ध लिहित आहात.

    भाजपाच्या आयटीसेलने त्यांची प्रतिमा खराब केली आहे. मोदी देशाच्या जनतेची एक किंवा दोन वेळेसच फसवणूक करु शकतात पण दरवेळी हे शक्य नाही असे एका युजरने म्हटले आहे.

    Rahul Gandhi will not be a good Leader of the Opposition, he will not be the Prime Minister, after Javed Akhtar’s tweet, the Congress troll broke down

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य